Posts

Showing posts from June, 2016

'बेडसे' पवना खोऱ्यातील कातळ सौंदर्यशिल्प

Image
बऱ्याचदा आपण कामकाजानिमित्ताने सह्याद्रीमधील घाट ओलांडीत असतो किंवा कुतूहलाने आणि उत्सुकतने एखाद्या किल्याची वाट चढत असतो किंवा घाटवाटेने वरच्या पायवाट तोडत जात असतो अश्यावेळेस दम लागल्यावर विश्रांतीसाठी कडेच्या एखाद्या दगडावर बसून आजूबाजूला पाहू लागतो तोच एखाद्या कड्याच्या पोटामध्ये पिंपळपानासारखी कमान दृष्टीस पडते किंवा एखादी सुंदर मूर्ती आपल्या डोळ्यांचे लक्ष वेधून घेते तेव्हा आपण चकित चित्ताने स्वतःला विचारतो हे धर्मकृत्य कोणाचे? कोण्या अनामिकाने हे केले असावे? कधी केले असावे? ही मूर्ती कोणाची? काय भावना असेल ही मूर्ती करताना? त्या अनामिक कारागिराचीअश्या आडवाटेवर हे शिल्प का कोरण्यात आले? असे सर्व प्रश्न अश्याच काही आडवाटा धुंडाळत असताना पडतात अश्या या सुंदर कलाकृती मनाला अनेक प्रश्न पाडतात तेथील निरव शांतता आपल्याला एका वेगळ्या इतिहासाच्या जगात घेऊन जाते. अश्याच एखाद्या आडवाटेवर जर भटकंती करायची असेल तर पवना खोऱ्यामध्ये ' बेडसे ' नावाचे एक कातळ सौंदर्यशिल्प लपलेले आहे. 
भाजे लेण्यांना जाताना दिसणारे दृश्य.
लोहगड - विसापूर - तुंग - तिकोना या चार बलदंड मावळच्या पहारेकऱ्यांच्…

दुर्गम आणि डौलदार तटबंदी असलेला दुर्ग 'विसापूर'

Image
लोणावळा ! महाराष्ट्रातील थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. वर्षाचे बारा महिने येथे पर्यटकांची गर्दी असते. पावसाळा हा ऋतु असेल तर मग काय विचारायलाच नको असंख्य पर्यटक लोणावळा आणि आजूबाजूच्या परिसरात भटकंती करायला येतात. लोणावळ्याच्या ह्या परिसरावर निसर्गकृपा एवढी आहे कि या लोणावळ्याच्या परिसरातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची यांसारखे बलदंड किल्ले, उल्हास, पवना यांसारख्या नद्यांच्या पात्रातील विपुल जलसंपत्ती, तसेच कार्ले डोंगरातील कार्ल्याची प्रसिद्ध लेणी आणि एकविरा देवी तसेच विसापूर किल्याच्या पोटातील सुंदर प्रसिद्ध भाजे लेणी तसेच अल्पपरिचित  पाटण लेणी आणि निसर्गनिर्मित ' नागफणी सुळका ' म्हणजेच ट्रेकर्स लोकांमध्ये प्रसिद्ध असलेला ' ड्युक्स नोज ' चा सुळका यांंसारखी प्रसिद्ध ठिकाणे ही लोणावळा आणि त्याच्या जवळची प्रसिद्ध ठिकाणे आहेत. 
याच लोणावळा शहरात जात असताना पुणे-मुंबई हमरस्त्यावर मळवली गावाच्या बाजूला आपले लक्ष एक दुर्गद्वयी वेधून घेते ही दुर्गद्वयी दुसरी तिसरी कोणती नसून ' लोहगड आणि विसापूर ' हे किल्ले लक्ष वेधून घेतात. यामध्ये आपल्याला दक्षिणेकडे दु…

आडवाटेवरची मुशाफिरी

Image
' मुसाफिर हुं यारो...ना घर है ठिकाना...मुझे बस चलते जाना है... '
ह्या गाण्याच्या ओळी कायम वेगवेगळ्या आडवाटेवरच्या जुन्या आठवणी ताज्या करून देतात. अनेक आडवाटांवर दरवेळेस येणारे नवीन अनुभव गाठीशी बांधून  महाराष्ट्रातील विविध डोंगर रांगा, समुद्र किनारे, नारळी-पोफळीच्या आत लपलेली अपरांतातील सुंदर छोटी छोटी गावे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बांधलेले किल्ले आणि सह्याद्रीच्या पोटात खोदलेल्या सुंदर लेण्या तसेचपावसाळ्यात बरसणारे सुंदर धबधबे आजही मनाला भुरळ घालतात .   
महाराष्ट्रात अश्या अनेक आडवाटा आहेत अश्या आडवाटांवर भटकताना त्या वाटांवरची केलेली 'मुशाफिरी' हि कायमच अनुभव समृद्ध असते. डोंगर-दऱ्या भटकताना विविध ठिकाणाची माहिती जमा करण्याचा छंद काही वेगळाच आनंद देऊन जातो. शालेय अभ्यासक्रमात वाचलेला इतिहास, भूगोल हे विषय जणू काही ह्या किल्यांवर आणि गिरीशिल्पांमधून आपल्याला खुणावू लागतात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ते करून देत असतात.
अश्याच अनवट वाटांवर भटकताना उन्हाळा,हिवाळा, पावसाळा या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या डोंगर रांगा विविध रुपाने नटलेल्या असतात. पावसाळ्यात खळखळणारे असंख्य…

हातगड किल्याची अपरिचीत जलदेवता

Image
आपल्या महाराष्ट्रात अनेक देवीदेवता आहेत. आपल्या महाराष्ट्राचा पूर्वीचा उल्लेख हा दंडकारण्य म्हणून सर्वश्रुत आहेच परंतु आजही बऱ्याच गावांमध्ये त्यांच्या मागे असलेल्या असलेल्या डोंगरावर किंवा गावात विविध देवी देवता आजही वास करून आहेत. या गावांमध्ये विविध देवी देवतांची पूजा हि पूर्वापार चालत आलेली आहे. अश्याच काही अज्ञात देवी देवता ह्या विविध कुळांच्या कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहेत.
बऱ्याचदा किल्यांवर असणाऱ्या गडदेवता हि त्या घराण्याच्या किल्लेदार आजूबाजूच्या गावातील देशमुख किंवा पाटलांची कुलदेवता असते तर त्या गावाची ग्रामदेवता किंवा एखाद्या गावाचे नाव हे त्या गडावरील देवी किंवा देवावरुन ठेवलेले असते. अश्या अनेक छोट्या मोठ्या देवी देवता या आपल्या महाराष्ट्रात आहे यातील काही देवतांचे उच्च स्थान आहे तर काही देवता या दुय्यम दर्जाच्या आहेत. परंतु या देवतांचे महत्व आजिबात कमी झालेले नाही. अशीच एक जलदेवता सह्याद्रीच्या कुशीत गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर यांच्या सीमेवर आपले महत्वाचे स्थान राखून आहे.  
गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असणाऱ्या हातगड किल्याची गडदेवता एकविरा माता किंवा…