हातगड किल्याची अपरिचीत जलदेवता


आपल्या महाराष्ट्रात अनेक देवीदेवता आहेत. आपल्या महाराष्ट्राचा पूर्वीचा उल्लेख हा दंडकारण्य म्हणून सर्वश्रुत आहेच परंतु आजही बऱ्याच गावांमध्ये त्यांच्या मागे असलेल्या असलेल्या डोंगरावर किंवा गावात विविध देवी देवता आजही वास करून आहेत. या गावांमध्ये विविध देवी देवतांची पूजा हि पूर्वापार चालत आलेली आहे. अश्याच काही अज्ञात देवी देवता ह्या विविध कुळांच्या कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहेत.

बऱ्याचदा किल्यांवर असणाऱ्या गडदेवता हि त्या घराण्याच्या किल्लेदार आजूबाजूच्या गावातील देशमुख किंवा पाटलांची कुलदेवता असते तर त्या गावाची ग्रामदेवता किंवा एखाद्या गावाचे नाव हे त्या गडावरील देवी किंवा देवावरुन ठेवलेले असते. अश्या अनेक छोट्या मोठ्या देवी देवता या आपल्या महाराष्ट्रात आहे यातील काही देवतांचे उच्च स्थान आहे तर काही देवता या दुय्यम दर्जाच्या आहेत. परंतु या देवतांचे महत्व आजिबात कमी झालेले नाही. अशीच एक जलदेवता सह्याद्रीच्या कुशीत गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर यांच्या सीमेवर आपले महत्वाचे स्थान राखून आहे.  

गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असणाऱ्या हातगड किल्याची गडदेवता एकविरा माता किंवा हातगडची देवी ही म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर प्रसिद्ध आहे. हि देवी अत्यंत पुरातन आहे या देवीचे मंदिर सापुतारा येथे जाताना आपणास दिसते. हातगड किल्याची मुख्य देवता म्हणून ह्या देवीची पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा होते. ह्या देवीचे वैशिष्ट्य म्हणजे हि देवी जलदेवता आहे ही स्वयंभू असून अत्यंत पुरातन आहे.ह्या देवीची पंचक्रोशीतील आख्यायिका अत्यंत सुंदर आहे. ‘ एका ब्राम्हणाने देवीची उपासना केली आणि तिला प्रसन्न करून घेतले आणि देवीला विनंती केली कि तू माझ्या घरी येऊन राहा देवी याच्यावर एक अट घातली मी तुझ्याकडे येऊन राहते परंतु तू मागे वळून बघायचे नाहीस तू जर मागे वळून बघितलेस तर मी आहे तिथे अदृश्य होणार असे बोलून तो ब्राम्हण चालू लागला परंतु त्याला मोह आवरला नाही आणि त्याने मागे वळून बघितले आणि देवी हातगड किल्याच्या पायथ्याला अंतर्धान पावली ’ अशी आख्यायिका पंचक्रोशीत आहे. त्या ठिकाणी हि देवी आजही आपल्याला जलदेवतेच्या रुपात दर्शन देत आहे.

हातगड किल्याचे किल्लेदार वणी जवळील अभोण्याचे देशमुख घराणे यांची ही कुलदेवता. या देवीचे मंदिर सप्त श्रुंगगडापासून १८ कि.मी. वर आणि सापुताऱ्या पासून ५ कि.मी. अंतरावर सह्याद्रीतील एक बेलाग किल्ला हातगडच्या कुशीत हि जलदेवता वास्तव्य करून आहे. ही देवता तेथील आदिवासींचे श्रद्धा स्थान आहे फार पूर्वी पासून या देवतेचे हातगड आणि सापुतारा पंचक्रोशीत महत्व आहे. 
________________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे - चाकण - राजगुरुनगर - नारायणगाव - संगमनेर - सिन्नर - नाशिक - दिंडोरी - वणी - आभोणे - हातगड.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा

Comments

Popular posts from this blog

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील शेक्सपिअर यांनी काढलेली '१९१५ मधील छायाचित्रे'

पुण्यामधील नारायण पेठेमध्ये असलेले अपरिचित 'शेषशायी विष्णू मंदिर'

पुणे शहराच्या विस्मृतीमध्ये गेलेला 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'