Posts

Showing posts from July, 2016

महाराष्ट्राची आणि सह्याद्रीची भौगोलिक रचना

Image
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
असा हा आपला महाराष्ट्राचा प्रदेश जर आपण पहिला तर हा महाराष्ट्र संपूर्ण भारतामधल्या कोणत्याही भूप्रदेशापेक्षा आकाराने मोठा आहे. आपल्या महाराष्ट्राच्या सीमा पहायला गेले तर महाराष्ट्राची पश्चिम सीमा ही अरबी समुद्राच्या किनाऱ्याबाजूने दमणपासून थेट कारवार पर्यंत पसरलेली आहे तसेच सोनगडावरून नर्मदेपर्यंत पसरलेली आहे तसेच ओंकारमांधाता (आजचा मध्यप्रदेशचा भाग) येथून जबलपूरपर्यंत महाराष्ट्राची उत्तर सीमा पसरलेली आहे. महाराष्ट्राची पूर्व सीमा ही राजनांदगाव येथून बेळगाव ते कारवार पर्यंत पसरलेली आहे. एवढ्या मोठ्या भूप्रदेशात महाराष्ट्राचा विस्तार झालेला आपल्याला पहायला मिळतो. अश्या पद्धतीमध्ये महाराष्ट्राच्या सीमा पसरलेल्या आपल्याला बघायला मिळतात.
आपला महाराष्ट्र देश सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहे हे सौंदर्य अनुभवायचे असेल तर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्या-डोंगर पायी फिरून अनुभवावे परंतु हा प्रवास करताना डोळे उघडे ठेवून फिरणे फार गरजेचे…