Posts

Showing posts from August, 2016

कान्हेरीची ' दीपतारा ' पश्चिमेची स्वामिनी

Image
महाराष्ट्रामध्ये सुमारे १२०० च्या आसपास सह्याद्रीच्या कठोर कातळात खोदलेल्या सुंदर लेण्या आहेत ह्या लेण्यांमध्ये काही लेण्या या आज जगप्रसिद्ध आहेत उदाहरण द्यायचे झाले तर अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजे या सारख्या सुंदर आणि कातळकोरीव लेण्यांमधील शिल्प पहिली असता आपल्या मनाला अनेक प्रश्न सतावतात त्या काळामध्ये आजसारखी प्रगत हत्यारे नसताना एवढी सुंदर शिल्प कशी काय कोरली असतील किंवा या गुहा खोदायला मानवाला किती वेळ लागला असेल हे सारे प्रश्न आपल्याला या सुंदर कातळातील लेण्या आणि शिल्प बघताना पडतात.
मुंबई मधील बोरीवली येथील संजय गांधी वन उद्यानात 'कान्हेरी' हि जगप्रसिद्ध लेणी आहे. बोरिवलीच्या 'कृष्णगिरी डोंगरामध्ये' खोदलेली हि सुंदर लेणी आपले मन थक्क करते. कान्हेरीची हि सुंदर लेणी अत्यंत सुरेख आहे. या कान्हेरी लेणी मध्ये बरीच सुंदर रेखीव शिल्प लपलेली आहेत. सगळे भटके, पर्यटक या कातळ लेणीमध्ये येतात फोटोग्राफी करतात आणि निघून जातात. परंतु येथील शिल्प अभ्यासकांसाठी फार महत्वाची आहेत. या शिल्पांवरून 'मुंबई' आणि प्रांताची प्राचीन संस्कृती अभ्यासाला हि शिल्प मदत करतात. या शिल्प…

उन्हेरे गावातील गरम पाण्याची कुंडे

Image
आपला महाराष्ट्र हा निसर्गाच्या विविध रुपाने नटलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात निसर्गाची विविध रूपे पहायला मिळतात अनुभवयाला मिळतात असे अनुभव घ्यायचे असल्यास भटकंती करून निसर्गाच्या किमायांचा अनुभव घ्यायचा असेल तर पाली जवळ ‘उन्हेरे’ या कोकणातील निसर्गाने नटलेल्या छोट्याश्या गावाला नक्की भेट द्यावी. 
पालीच्या गणपतीला सगळेच जण जातात परंतु या पाली गावाच्या जवळच असणाऱ्या ‘उन्हेरे’ गावामध्ये असणाऱ्या फारश्या परिचित नसलेल्या गरम पाण्याच्या कुंडाना जायचे असेल तर पालीपासून थोडीशी वाकडी वाट नक्की करून जावे. उन्हेरे येथे पोहोचायला स्वतःची गाडी असेल तर उत्तमच. निसर्गामध्ये आढळणारी वैशिष्ट्ये यांचे आकर्षण सगळ्यांनाच असते. असेच हे एक निसर्गातील वैशिष्ट्य रायगड जिल्ह्यामधील ‘उन्हेरे’ गावामध्ये लपलेले आहे.
पुणे आणि मुंबई पासून अत्यंत जवळ असलेले ठिकाण अत्यंत सुंदर आहे. पालीच्या गणपती बाप्पाच्या मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेली 'उन्हेरे' गावाची हि कुंडे आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत ती त्यांच्या गरम पाण्यामुळे. हि कुंडे फारशी प्रसिद्धी झोतात नाहीत त्यामुळे या कुंडाच्या आजूबाजूचा निसर…

नाशिक येथील ' दुधसागर ' धबधबा

Image
महाराष्ट्रामध्ये जसे किल्ले, किल्ले, लेण्या, मंदिरे याचा जसा ऐतिहासिक वारसा लाभला आहे तसाच भौगोलिक वारसा देखील लाभला आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक वारसा पाहायचा असेल तर थोड्या आडवाटेवर फिरस्ती करत आजूबाजूचा भूप्रदेश न्याहाळला पाहिजे अश्याच छोट्या मोठ्या आडवाटेवर निसर्गातील बऱ्याच गोष्टी त्यांचे अस्तित्व टिकवून उभ्या असतात या अश्याच नैसर्गिक आणि भौगोलिक गोष्टी आपले लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतात.
ह्या नैसर्गिक आणि भौगोलिक गोष्टी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आजूबाजूच्या परिसरातील धबधबे, नदीचा डोह, रांजण खळगे, नैसर्गिक गुहा, गरम पाण्याचे झरे अश्या वेगवेगळ्या भौगोलिक वारसा समृद्धीने महाराष्ट्राचे वेगळेपण दिसून येते. असाच एक भौगोलिक महत्व असलेला 'दुधसागर' धबधबा हा गोदावरी नदीच्या प्रवाहामुळे नाशिक येथे तयार झाला आहे.

नाशिक शहर हे भारताचे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे शहर. नाशिक शहराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या शहराच्या आजूबाजूला असणारी उत्तुंग गिरीशिखरे, लेण्या, मंदिरे आणि किल्ले याबरोबर काही भौगोलिक आश्चर्ये या नशिक शहराच्या परिसरात आहे. असाच एक नैसर्गिक 'दुधसागर धबधब…

पुण्यनगरीमधील कलात्मक शिल्प मंदिर 'त्रिशुंड गणपती'

Image
महाराष्ट्रामध्ये अनेक सुंदर सुंदर मंदिरे आहेत. या मंदिरांच्या प्रदेशात अनेक लहानमोठ्या गावांमध्ये असलेली प्राचीन मंदिर ही महाराष्ट्राचे वेगळेपण दर्शवतात. महाराष्ट्रातील ही प्राचीन मंदिरे आपल्याला अनेक लहान मोठ्या गावांमध्ये बघायला मिळतात. ही  मंदिरे जणू या गावांचा इतिहास सांगत आजही येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाला आपला प्राचीन इतिहास सांगत असतात आणि इतिहासाच्या पाउलखुणा जपत असतात तसेच संस्कृती देखील टिकवून ठेवण्यास मदत करतात.  अश्याच जुन्या मंदिरांपैकी एक सुंदर शिल्पांनी अलंकृत असलेले एक सुंदर मंदिर पुणे शहराच्या भरवस्तीत वसलेले आहे.
पुणे हि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते तसेच पुणे हे मंदिरांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. या पुण्याच्या परिसरात अशी बरीच छोटी मोठी असंख्य राउळे आपल्याला बघायला मिळतात यातील काही मंदिरे हि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत अश्याच वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांपैकी एक संपूर्ण कातळात केलेले कोरीव काम असणारे आणि १७ व्या शतकाची ओळख जपणारे एक ऐतिहासिक 'त्रिशुंड गणपती' मंदिर पुण्यातील सोमवार पेठेमध्ये भरवस्तीमध्ये आजही मोठ्या दिमाखात उभे आहे.

त्रिशुंड ग…

' महाराष्ट्र ' नावाचा इतिहास

Image
महाराष्ट्र हे नाव कसे उत्पन्न झाले किंवा या नावाची व्युत्पत्ती कशी झाली याचा शोध घ्यायचा आजपर्यंत खूप जणांनी प्रयत्न केला आहे या नावामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात लपलेले असंख्य धागे आपल्याला मिळू शकणार आहेत. यासाठी प्रत्येक देशाच्या नावातील रहस्य समजून घेणे फार महत्वाचे आहे. जगातील प्रत्येक राष्ट्राच्या कितीतरी ऐतिहासिक कोड्यांचा उलगडा हा राष्ट्राच्या नामाभिधानावरुन झालेला आपल्याला पाहायला मिळतो.पण आजही महाराष्ट्र हे नाव कसे पडले याबाबत बरीच गुंतागुंत आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्र हा शब्द प्राचीन आहे का किंवा नाही ह्यावरून देखील अनेक मतभेद आपल्याला बघावयास मिळतात. आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी समजूत आहे कि महाराष्ट्र हा शब्द पूर्वीपासून असून महाराष्ट्रात राहणारे ते मरहट्ट अशी आजही समजूत आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात  डोकवले असता महाराष्ट्राला तीन हजार वर्षांची परंपरा असलेली आपल्याला दिसते. हि परंपरा सुरु होते ती अगस्त्य ऋषींपासून वेद किंवा जुने पुरावे शोधून काढले तर दंडकारण्य हा उल्लेख आपल्याला महाराष्ट्राबद्दल सापडतो. शकांच्या आक्रमणापूर्वी तिसऱ्या शतकात साधारणपणे आर्यांचे य…