उन्हेरे गावातील गरम पाण्याची कुंडे


आपला महाराष्ट्र हा निसर्गाच्या विविध रुपाने नटलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात निसर्गाची विविध रूपे पहायला मिळतात अनुभवयाला मिळतात असे अनुभव घ्यायचे असल्यास भटकंती करून निसर्गाच्या किमायांचा अनुभव घ्यायचा असेल तर पाली जवळ उन्हेरेया कोकणातील निसर्गाने नटलेल्या छोट्याश्या गावाला नक्की भेट द्यावी. 

पालीच्या गणपतीला सगळेच जण जातात परंतु या पाली गावाच्या जवळच असणाऱ्या ‘उन्हेरे’ गावामध्ये असणाऱ्या फारश्या परिचित नसलेल्या गरम पाण्याच्या कुंडाना जायचे असेल तर पालीपासून थोडीशी वाकडी वाट नक्की करून जावे. उन्हेरे येथे पोहोचायला स्वतःची गाडी असेल तर उत्तमच. निसर्गामध्ये आढळणारी वैशिष्ट्ये यांचे आकर्षण सगळ्यांनाच असते. असेच हे एक निसर्गातील वैशिष्ट्य रायगड जिल्ह्यामधील ‘उन्हेरे’ गावामध्ये लपलेले आहे.

पुणे आणि मुंबई पासून अत्यंत जवळ असलेले ठिकाण अत्यंत सुंदर आहे. पालीच्या गणपती बाप्पाच्या मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेली 'उन्हेरे' गावाची हि कुंडे आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत ती त्यांच्या गरम पाण्यामुळे. हि कुंडे फारशी प्रसिद्धी झोतात नाहीत त्यामुळे या कुंडाच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर टिकून राहिला आहे. फारशी प्रसिद्ध नसलेली गरम पाण्याची कुंडे पाली गावापासून ४ कि.मी. अंतरावर बांधून काढलेली पाहायला मिळतात. उन्हेरे येथील या गरम पाण्याच्या कुंडातील तापमान साधारणतः ४८ ते ५०  सें च्या दरम्यान असते.


अत्यंत सुंदर असणारी हि कुंडे एका सरळ रेषेमध्ये खोदली आहेत ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अशी विविध कुंडे आपल्याला पाहायला मिळतात. ह्या निसर्गनिर्मित कुंडामधील पाणी हे गंधकयुक्त आहे. या पाण्याने आंघोळ केली असता आपल्या त्वचेचे रोग बरे होतात. 

या गरम पाण्याच्या कुंडांमध्ये रिकाम्यापोटी जाऊ नये अन्यथा चक्कर येणे किंवा हातापायात गोळे येणे अश्या अडचणी येऊ शकतात. संपूर्ण खबरदारी घेऊन कुंडामध्ये मनसोक्त जलतरणाचा आनंद घ्यावा. ह्या गरम पाण्याच्या कुंडाशेजारीच विठ्ठल रखुमाईचे छोटेसे कोकणी बांधणीमधले सुंदर मंदिर आहे.  

अश्या या अनवट वाटेवरच्या भौगोलिक विविधतेने नटलेल्या ठिकाणी जाणे म्हणजे पर्वणीच असते. तसेच आपल्या कुटुंबाबरोबर जाऊन एका सुंदर आडवाटेवर वाटेवर फिरून निसर्गाच्या रूपाचे एक वेगळ्या रूपाचे दर्शन घेऊन आपण आपल्या एक सफल यात्रेची सांगता करू शकतो.  
______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे – तळेगाव – लोणावळा – खोपोली – पाली – उन्हेरे.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

______________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा       

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage