Posts

Showing posts from September, 2016

भटक्यांची पंढरी हरीश्चंद्रगड येथील वाटेवरचे 'व्याघ्रशिल्प'

Image
महारष्ट्रामध्ये प्राचीन कालापासून देव हि संकल्पना आहे हे आताच्या वेगवेगळ्या उत्खनना वरून सिद्ध झालेले आहे. प्राचीन सिंधू संस्कृतीशी संबंध असलेल्या महाराष्ट्रा मध्ये ज्या प्राचीन संस्कृती नांदत होत्या त्या संस्कृतीच्या संबंधित महाराष्ट्रामध्ये जी काही उत्खनने झाली त्यामध्ये विविध प्राण्यांच्या मूर्ती ह्या देव होत्या हे सिद्ध झालेले आहे. दायमाबाद येथील उत्खननात काही प्राणी मूर्ती देखील सापडल्या आहेत.

तसेच अजून एक उदाहरण घ्यायचे झाले तर भीमबेटका येथील गुहांमध्ये जी भित्तीचित्रे काढलेली आहेत ती फार महत्वपूर्ण उदाहरणे म्हणून ठरतात. अशीच काही प्राण्यांची चित्रे हि महाराष्ट्रामधील दऱ्या डोंगरांमध्ये आजही आपल्याला सापडतात त्यापैकी एक दगडामध्ये कोरलेले सुंदर 'व्याघ्रशिल्प' हे डोंगर भटक्यांची पंढरी असलेल्या प्रसिद्ध हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर आपल्याला पहायला मिळते.

अश्मयुग काळापासून मनुष्य निसर्गपूजा आणि प्राणीपूजा करत असल्याचे आपल्याला पुराव्यानिशी बघायला मिळते. त्यापैकी एक उत्तम उदाहरण म्हणजे हरिश्चंद्र गड येथे जाताना लागणारे व्याघ्रशिल्प. हे व्याघ्रशिल्प कोणी स्थापन केले किंवा कोणी को…

कथा ब्राम्ही लिपीची...!!!

Image
महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याचदा डोंगर भटकंती दरम्यान इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत असतो या पाऊल खुणा शोधत असताना आपल्या नजरेला बऱ्याच गोष्टी येत असतात जसे कि वीरगळ, गद्धेगाळ, कोरीव लेण्यांमध्ये असलेले महत्वाचे शिलालेख तसेच किल्यांवर आढळणारे शिलालेख हा सर्व ऐतिहासिक ठेवा इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. 
अश्याच एक ऐतिहासिक ठेवा म्हणजे 'ब्राम्ही लिपी' मधले शिलालेख हे शिलालेख आपल्याला बऱ्याचदा लेण्यांच्या भिंतीवर, लेण्याच्या टाक्यावर, लेण्याच्या विहारात किंवा खाबांवर कोरलेले आपल्याला मिळतात अश्या या ब्राम्ही लिपीच्या शिलालेखांमधून आपल्याला प्राचीन भारताची संस्कृती समजण्यास मदत होते किंवा त्या काळातील एखाद्या व्यक्तीचे नाव समजायला आपल्याला मदत होते अश्या या ब्राम्ही लिपीचा इतिहास देखील मजेशीर आहे. ही ब्राम्ही लिपी वाचण्याचा  शोध कसा लागला  हे समजणे देखील खूप महत्वाचे आहे.

एखाद्या लेण्यामध्ये तसेच जे कोणतेही आजच्या काळामध्ये ब्राम्ही लिपीमध्ये लिहिलेले लेख सापडतात ते वाचायचे कसे किंवा त्याचा अर्थ काय या गोष्टीचा शोध हा इ.स. १८३४ साली ईस्ट इंडिया कंपनी मध्ये धातू तपासनीस म्हणून …

गिर्यारोहकांचा सखा आणि गुरु: 'सह्याद्री'

Image
|| सह्याद्री सारखा नाही रे सोयरा || || गुरु सखा बंधू मायबाप ||

महाराष्ट्राचे नाव घेतले तर त्याबरोबर आपसूक नाव येते ते 'सह्याद्रीचे'. 'सह्याद्री' हा महाराष्ट्राचा निर्माता आहे तसेच सह्याद्री हेच महाराष्ट्राचे भौगोलिक सत्व आहे. एकदा का या सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर फिरायला लागले कि या सह्याद्रीमधील अनेक गोष्टींची आपल्याला नव्याने ओळख होते. नवी नवी भूरूपे, सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या छोट्या छोट्या नद्या, शिखरे, आव्हान देणारे विविध सुळके, सह्याद्रीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर उभारेले विविध किल्ले, मंदिरे, सह्याद्रीच्या एकसंध पाषाणामध्ये घडवलेल्या लेण्या या सर्व ठिकाणावरून सह्याद्रीची आपल्याला विविध रुपात ओळख होते आणि मग सुरुवात होते ती सह्यभटकंतीची.
सह्याद्रीच्या याच दऱ्या-खोऱ्यांमध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. किल्यांवर भटकताना आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात तेथील जनमानसातील माणुसकीचे येणारे अनुभव तुम्हाला कधी शहरात येणार नाही. सह्याद्री फिरणे आणि अनुभवणे यामध्ये खूप फरक आहे. प्रत्येक सह्यभ्रमंती मध्ये हा 'सह्याद्री' हा गुरु आपल्या बरोबर आपल्याला साथ द्यायला अस…

किल्ल्ले, लेणी, मंदिरे यांमध्ये सापडणारे वैशिष्ट्यपूर्ण ' गणपती '

Image
आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन दैवते जास्त लोकप्रिय आहेत एक म्हणजे महादेव आणि दुसरा याच शिवकुळामधील सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत म्हणजे गणपती संपूर्ण महाराष्ट्रात या देवतांचा अधिवास हा महाराष्ट्रातील किल्ले आणि शिखरांवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. रतनगड, हडसर, सिंदोळा, राजगड, धोडप, हरिश्चंद्रगड, तुंग, संतोषगड अश्या विविध किल्यांवर या गड-किल्यांवर गणपती ही देवता पहावयास मिळते तसेच गणपती देवता आपल्याला विविध रूपामध्ये देखील आढळते. याच वेगवेगळ्या किल्यांवर, लेणी, मंदिरे, यांमध्ये वेगवेगळ्या रुपात आढळणाऱ्या गणपतींचा घेतलेला हा आढावा.  
संपूर्ण भारतामध्ये पूजनीय मानल्या जाणाऱ्या 'गणपती' या देवतेची उपासना प्राचीन काळापासून केली जाते परंतु गणपती हि देवता आपल्याला प्रतिमारुपात आणि शिलालेखीय पुरावे या रुपामध्ये साधारणपणे इ.स. ४ थ्या किंवा ५ व्या शतकापासून सापडते. गणपतीच्या प्रतिमा या आपल्याला गुप्तकाळापासून  सापडण्यास सुरुवात होते. असे विविध कालखंडात गणपतीचे पुरावे आपल्याला मिळतात आणि हजार वर्षांचा प्रवास देखील बघायला मिळतो. अशी हि गणपती देवता सगळ्यांचीच लाडकी देवता आहे. म…

वसिष्ठीच्या मुखाजवळचे अपरिचित गिरीशिल्प 'पांडव लेणे'

Image
महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणे आहेत कि त्यांची माहिती मिळवण्याचा किंवा शोधून काढायचा कितीही प्रयत्न केला तरी म्हणावी तशी माहिती आपल्याला सापडत नाही अशीच काहीशी गत काही आडवाटेवर असलेल्या लेण्यांच्या बद्दल होते. महाराष्ट्रात अनेक परिचित आणि अपरिचित 'लेण्या आणि किल्ले' आहेत. यातील बऱ्याच लेण्यांना भटके आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात तर काही सुंदर 'गिरीशिल्पे' आजसुद्धा इतिहासाचे मूक साक्षीदार बनुन सह्याद्रीमध्ये वर्षानुवर्षे उन, वारा, पाऊस झेलत ताठ मानेने त्यांचे अस्तित्व दाखवत उभे असलेले आपल्याला बघायला मिळतात.

एकेकाळी हीच सुंदर गिरीशिल्पे कोकणातून घाटावर जाण्यासाठी पांतस्थांच्या मुक्कामाची ठिकाणे आणि धर्म तत्वज्ञानासाठी म्हणून कोरली गेली. या लेण्यांचा वापर बौद्ध भिक्षु त्यांच्या वर्षावासाच्या काळात राहण्यासाठी करत असत अश्याच अनेक ऐतिहासिक घटनांची मूक साक्ष देत कोकणातील वासिष्ठीच्या मुखाजवळ 'पांडव लेणे’ नावाचे सुंदर गिरीशिल्प सह्याद्रीच्या पोटात खोदले गेलेले सुंदर गिरीशिल्प आजही भटक्यांची आतुरतेने वाट पाहात आहे.


कोकणच्या भूमीची जीवनदायनी वसिष्ठीच्या मुखाव…