भटक्यांची पंढरी हरीश्चंद्रगड येथील वाटेवरचे 'व्याघ्रशिल्प'


महारष्ट्रामध्ये प्राचीन कालापासून देव हि संकल्पना आहे हे आताच्या वेगवेगळ्या उत्खनना वरून सिद्ध झालेले आहे. प्राचीन सिंधू संस्कृतीशी संबंध असलेल्या महाराष्ट्रा मध्ये ज्या प्राचीन संस्कृती नांदत होत्या त्या संस्कृतीच्या संबंधित महाराष्ट्रामध्ये जी काही उत्खनने झाली त्यामध्ये विविध प्राण्यांच्या मूर्ती ह्या देव होत्या हे सिद्ध झालेले आहे. दायमाबाद येथील उत्खननात काही प्राणी मूर्ती देखील सापडल्या आहेत.

तसेच अजून एक उदाहरण घ्यायचे झाले तर भीमबेटका येथील गुहांमध्ये जी भित्तीचित्रे काढलेली आहेत ती फार महत्वपूर्ण उदाहरणे म्हणून ठरतात. अशीच काही प्राण्यांची चित्रे हि महाराष्ट्रामधील दऱ्या डोंगरांमध्ये आजही आपल्याला सापडतात त्यापैकी एक दगडामध्ये कोरलेले सुंदर 'व्याघ्रशिल्प' हे डोंगर भटक्यांची पंढरी असलेल्या प्रसिद्ध हरिश्चंद्रगडाच्या वाटेवर आपल्याला पहायला मिळते.

अश्मयुग काळापासून मनुष्य निसर्गपूजा आणि प्राणीपूजा करत असल्याचे आपल्याला पुराव्यानिशी बघायला मिळते. त्यापैकी एक उत्तम उदाहरण म्हणजे हरिश्चंद्र गड येथे जाताना लागणारे व्याघ्रशिल्प. हे व्याघ्रशिल्प कोणी स्थापन केले किंवा कोणी कोरून काढले याचा मात्र पत्ता लागत नाही. हरिश्चंद्र गड येथे जाताना आपण खिरेश्वर येथून चढायला सुरुवात करतो त्यावेळेस वाटेमध्ये हे सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळते आणि आपण नक्कीच त्या शिल्पाकडे उत्सुकतेने बघतो.


हरिश्चंद्र गडावर जाताना बऱ्याचदा लोकांचे विसाव्याचे मुख्य ठिकाण म्हणून या व्याघ्रशिल्पाचच्या  स्थानी घटकाभर थांबतात. हे व्याघ्रशिल्प म्हणजे आजूबाजूच्या डोंगररांगामध्ये राहणारे आदिवासी लोकांचे दैवत हि आदिवासी लोकं आजही प्राण्यांच्या रुपामध्ये असलेल्या वन्य प्राण्यांची  पूजा करताना आपल्याला  संस्कृतीमध्ये दिसते. प्राण्यांची पूजा करणे हि संस्कृती अश्मयुगीन काळापासून आलेली आपल्याला दिसते. हरिश्चंद्रगडावर असलेले व्याघ्रशिल्प हे अत्यंत सुबकरित्या कोरलेले आपल्याला पाहायला मिळते.

या शिल्पामध्ये असलेला वाघ आपल्याला व्यवस्थित सुस्पष्ट दिसतो यावरून आपण नक्की अंदाज करू शकतो कि सह्याद्रीच्या या दाट जंगलामध्ये कोणेएकेकाळी वाघाचे अस्तित्व नक्की असणार म्हणूनच या शिल्पाची निर्मिती करून या परिसरात त्याची पूजा केली जात आहे. आजही आदिवासी बांधवांकडून या व्याघ्रशिल्पाची पूजा केली जाते. अश्या या शिल्पांमुळे महाराष्ट्रातील वनराई नक्की जपली जाते. या व्याघ्रशिल्पाच्या अस्तित्वामुळे आजूबाजूला जे जंगल आहे त्यामुळे हरिश्चंद्रगड आणि आजूबाजूच्या परिसरात असणारे जंगल आणि प्राणी संपत्ती यांचे नक्कीच संरक्षण या व्याघ्रशिल्पामुळे होते.


जेव्हा केव्हा तुम्ही हरिश्चंद्रगडाची वारी कराल तेव्हा हे शिल्प नक्की बघा त्याबाबत कोणाला जास्त माहिती मिळवता आली तर त्याचा अभ्यास नक्की करा. अशी हि सह्याद्रीमधील अनेक शिल्प भटक्यांना बोलावत आहेत तर ह्या शिल्पांसाठी एखादी हरीश्चंद्रगडाची यात्रा नक्की करा.      
______________________________________________________________________________________________

कसे जाल :-
पुणे- चाकण - राजगुरुनगर - मंचर - नारायणगाव - आळेफाटा - खिरेश्वर.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
______________________________________________________________________________________________ 

लिखाण आणि छायाचित्रे © २०१६ महाराष्ट्राची शोधयात्रा.
No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage