Posts

Showing posts from October, 2016

गिर्यारोहकांच्या आवडत्या मुंब्रा कड्यावरची निवासिनी 'मुंब्रा देवी'

Image
'श्रीस्थानक उर्फ ठाणे' शहर हे महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी मुंबई जवळ असलेले एक महत्वाचे शहर. हजारो लोकं रोजचे या शहरातून ये जा करत असतात बऱ्याच नवीन कंपनीची ऑफिस या ठाणे शहराच्या आजूबाजूला उभारली गेली असल्याने या शहराचे रूप मात्र वर्षानुवर्षे पालटत गेले. प्राचीन काळातील 'श्रीस्थानक' या नावाचा अपभ्रंश होत 'ठाणे' या शहराचे नामकरण झाले. मुळातच 'ठाणे उर्फ श्रीस्थानक' या प्राचीन शहराला लाभलेले निसर्गाचे वरदान आणि आजूबाजूच्या डोंगररांगा आणि नद्यांमुळे लाभलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना यामुळे प्राचीन काळापासून ठाणे शहराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. या ठाणे शहराच्या आजूबाजूस उंच सखल डोंगर रांगा असल्याने देशातून कोकणात उतरणारे प्राचीन मार्ग मात्र भरपूर आहेत. याच ठाणे शहराजवळील सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या सानिध्यामध्ये वसलेली आहे ती 'मुंब्रा देवी'

मुंब्रा देवीचा डोंगर.
तसे पहायला गेले तर ठाणे शहरामध्ये आणि आजूबाजूला डोंगरावर फारशी मंदिरे दिसून येत नाही. प्राचीन काळापासून महत्व असलेल्या या महाराष्ट्राच्या औद्योगिक नगरीमध्ये पूर्वेला एक डोंगर आपल्याल…

प्राचीनतेची साक्ष देणाऱ्या खंबाटकी घाटाची 'खांब टाक्यावरील खामजाई देवी'

Image
सह्याद्रीमध्ये प्राचीनतेची साक्ष देणारी अनेक ठिकाणे दडलेली आहेत. हि सर्व प्राचीनतेची साक्ष देणारी ठिकाणे काही आडवाटांवर वसलेली आहेत तर काही मुख्य महामार्गांवर वसलेली आहेत. महाराष्ट्राच्या प्राचीनतेच्या इतिहासाची साक्ष देणारे एक ठिकाण वसलेले आहेत प्रत्यक्ष खंबाटकी घाटामध्ये. आता हा विचार कराल की खंबाटकी घाटामध्ये कोणते असे ठिकाण आहे कारण हा खंबाटकी घाट म्हणजे मुंबई-बंगळूर(बेंगलोर) हमरस्त्यावरील प्रमुख घाट.

खंबाटकी घाटाच्या मध्यावर घाटदेवता 'खामजाई देवीचे' छोटेसे मंदिर आहे या मंदिराकडे जाताना येताना जास्त कोणाचे लक्ष देखील जात नाही हे 'खामजाई देवीचे' मंदिर ज्या ठिकाणी बांधलेले आहे ते दुसरे तिसरे काहीही नसून खंबाटकी घाटाची प्राचीनतेची साक्ष देणारे सुंदर 'खांब टाके' आहे. महाराष्ट्रामध्ये देशावरून कोकणात जाण्यासाठी या सर्व प्राचीन घाटवाटांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे त्या प्राचीनतेची साक्ष देत असलेला एक पुरातन घाट म्हणजे खंबाटकी घाट.


या खंबाटकी घाटाचे पूर्वीचे नाव हे पारगाव खंडाळा या पायथ्याच्या नावामुळे खंडाळा घाट असे होते. या घाटाच्या मध्यावर असलेल्या खांब टाक…

मराठी भाषेचा उदय सांगणारे महत्वपूर्ण 'शिलालेख'

Image
कर्नाटक हे महाराष्ट्राला चिटकून असलेले ऐतिहासिक राज्य. या कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या मोठ्या राजसत्ता होऊन गेला त्यापैकी 'विजयनगर' हे साम्राज्य कोणाला माहिती नाही असे आजीबात नाही अत्यंत मोठी भरभराट असलेले हे राज्य. या विजयनगर साम्राज्यात काही काळ महाराष्ट्राचा काही भाग सामावलेला होता. याच कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या 'हसन' हा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य जिल्हा. या सुंदर निसर्गरम्य 'हसन जिल्ह्यामध्ये' जवळपास २३०० वर्षांचा इतिहास लाभलेले सुंदर गाव आहे. ते सुंदर गाव दुसरे तिसरे कोणते नसून जैन धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठिकाण म्हणजे 'श्रवणबेळगोळ' होय. 
'श्रवणबेळगोळ' मुळात प्रसिद्ध आहे ते तेथील 'गोमटेश्वर' याच्या मूर्तीसाठी हि मूर्ती तब्बल ५८ फुट असून अशी मूर्ती बाकी जगात कोठेही बघायला मिळत नाही. हीच ती प्रसिद्ध गोमटेश्वराची मूर्ती 'गंगराज राजमल्ल यांचा प्रमुख सेनानी आणि पंतप्रधान चामुंडराय याने आपली माता कालिकादेवी हिच्या सांगण्यावरून हा गोमटेश्वरचा पुतळा उभारला. या चामुंडरायाचे नाव हे गोमटे असे देखील होते'. हा या पुतळ्याचा इतिहास.…

'सह्याद्री निवासिनी'

Image
नुकतेच गणपती संपलेले आहेत. यंदा पाउस देखील जास्त झाल्यामुळे बळीराजा देखील आनंदी आहे शेतामधील पिके देखील सुंदर भासत आहेत अश्यामध्ये गणपती नंतरचे पंधरा दिवस संपून सर्व महाराष्ट्रामध्ये घराघरांमध्ये चाहूल लागली आहे ती नवरात्राची. नवरात्राचे नऊ दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे आणि प्रसन्नतेचे वातावरण असते. हेच प्रसन्नतेचे वातावरण अनुभवण्यासाठी सह्याद्रीमधील 'सह्यनिविसिनी' असलेल्या गडदेवतांचे दर्शन कसे नाही घेऊन चालणार या आडवाटांवर आणि विविध किल्यांच्या माथ्यावर किंवा गुहेमध्ये विराजमान असलेल्या सह्याद्रीतील 'गडमाथ्यांवरच्या देवींच्या' दर्शनाला जायचे असेल तर घरातून सह्ययात्रेला बाहेर पडावे. 

राजगड किल्यावरची गडदेवता पद्मावती देवी. 
सह्ययात्रेमध्ये आपल्याला गडदेवींचे विविध रुपामध्ये दर्शन घडते त्यामध्ये देवीची रूपे हि अनघड तांदळ्यामध्ये तर कधी अष्टभुजारुपात तर कधी सप्तमातृकारुपात तर कधी लेणीमध्ये कोरलेल्या शिल्प रुपांमध्ये या देवतांचे जे दर्शन आपल्याला दर्शन होते ते एक वेगळीच उर्जा प्राप्त करून देते. या गडदेवतांना आजही पंचक्रोशीमध्ये तेवढेच ,महत्व आहे जेवढे पुरातन काळाम…