Posts

Showing posts from November, 2016

निसर्गाचा सुंदर अविष्कार 'इंद्रवज्र'

Image
पावसाळ्याच्या सुरुवातीला काळ्या निळ्या क्षितिजावर दिसणारे अर्धवर्तुळाकार इंद्रधनूष्य आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला निसर्ग नवलाचे अधिक कुतूहल वाटते. आकाशाच्या निळ्या रंगामध्ये अचानकपणे उन सावल्यांच्या खेळामध्ये फिकट सप्तरंगाची झालेली उधळण अचानक पणे आपले चित्त वेधून घेते हि सप्त रंगांची उधळण आपल्याबरोबर आपण इतरांनाही दाखवतो आणि सांगतो "ते बघा इंद्रधनुष्य" पण हेच इंद्रधनुष्य संपूर्ण गोल वर्तुळाकार दिसले तर ?? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.  
हा निसर्गाचा सुंदर सोहळा स्वतःअनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या कडेकपारी नक्कीच धुंडाळाव्या लागतात निसर्गाच्या विविध भौगोलिक रूपांचे दर्शन हे आपल्याला डोंगरयात्रे मध्येच होते. इंद्रवज्राची महाराष्ट्रामध्ये म्हणजे सह्याद्री परिसरात पहिल्यांदा नोंद केली ती 'कर्नल साईक्स' या ब्रिटीश अधिकाऱ्याने ती देखील हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर. इ.स.१८३५ मध्ये घोड्यावरून रपेट मारीत सकाळच्या वेळेला हरिश्चंद्रगडाच्या प्रसिद्ध 'कोकण कड्यावर' गेलेल्या साईक्सला मोठे विलोभनीय दृश्य दिसले होते. 'कर्नल साईक्स' आणि त्याचा घोडा  तसेच त्याच…

अश्मयुगीन माणसाचे वास्तव्य असणारे 'वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा'

Image
माणसाच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट जर पहिली तर माणसाचे आयुष्य हे इतिहासाशी निगडीत आहे. माणसाच्या आयुष्यामधील प्रत्येक गोष्टीचा संबंध हा इतिहासातील प्रत्येक घटने बरोबर संबधित असतो. इतिहास हा म्हणजे केवळ सनावळ्या किंवा लढाया नव्हे. माणसाच्या इतिहासात बऱ्याच सांस्कृतिक, नैसर्गिक घटनांचा काळ महत्वाचा असतो. यामध्ये आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती, आजूबाजूची भौगोलिक परिस्थती आणि त्यामध्ये घडत गेलेले बदल या साऱ्यांचा अभ्यास आपल्याला इतिहासात करावा लागतो. गावोगावी सापडणारे ताम्रपट आणि शिलालेख हे आपल्याला इतिहासातले महत्वाचे दुवे ठरतात. या विविध दुव्यांवरून आपल्याला माणसांच्या आयुष्यातील घडलेले बदल आपल्याला दिसून येतात. मानवाची प्रगती यामध्ये दिसून येते.

या सर्व इतिहासाचा मागोवा घ्यायचा असेल तर आपल्याला सुरुवात ही वल्कल पासून नायलॉन पर्यंत वापरात असलेल्या कपड्यांच्या वापराचा इतिहास हा देखील पाहावा लागतो या गोष्टीला मानवी आयुष्यात फार महत्वाचे स्थान आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या अश्मयुगापासून असणाऱ्या प्राथमिक गरजा या गरजा भाग्वाण्यासाठी माणसाच्या प्रगतीचे टप्पे महत्वाचे ठरतात अश्याच …