Posts

Showing posts from December, 2016

पुण्याच्या प्रसिद्ध पर्वतीच्या कुशीमध्ये लपलेले कातळशिल्प 'पर्वतीचे लेणे'

Image
'पुणे' हे महाराष्ट्रामधील शांत आणि सांस्कृतिक शहर अशी पुण्याची सर्वत्र ख्याती आहे. जे कोणीहि पुण्यामध्ये राहायला येतात ते मात्र या पुण्याच्या प्रेमात पडतात. अश्या या पुण्याला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे परंतु विकासाच्या गतीमुळे मात्र जसजश्या पुण्याच्या सीमा विस्तारत चालल्या आहेत तसे तसे पुण्यामधील इतिहासाच्या पाऊलखुणा या विकासाच्या नावाखाली कुठेना कुठे काळाच्या पडद्याआड होत चाललेल्या दिसत आहेत. अश्याच काही लपलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पुणे आणि त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात त्यापैकी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे सर्व पुणेकरांच्या आवडीची 'पर्वती'. 
आता पर्वतीवर काय आहे असे इतिहासातले लपलेले असा मात्र प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्यामध्ये हे पण नक्की विचारले जाईल कि आजपर्यंत एवढ्यावेळेस पर्वतीला गेलो पण बाकी इतिहासातली कोणती गोष्ट अशी आहे कि ती पर्वतीवर आहे? तर या पुणेकरांच्या लाडक्या पर्वतीवर लपलेले आहे चक्क एक सुंदर कातळ 'लेणे' ज्यांना हे माहिती आहे ते 'पर्वतीची लेणी' असा त्याचा उल्लेख करतात.
पुण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात राष्ट्रकुट क…

पुरंदर किल्याच्या पायथ्याला वसलेल्या प्राचीन नारायणपूर गावाचा 'नारायणेश्वर'

Image
महाराष्ट्रामध्ये 'नारायण' या नावाने बरीचशी छोटी छोटी गावे वसलेली आहेत यापैकी काही गावांना बराच जुना इतिहास लाभलेला आहे. अश्याच काही 'नारायण' नावाच्या अक्षराने सुरु होणारे एक नारायणपूर नावाचे प्राचीन गाव हे पुरंदर आणि वज्रगड या ऐतिहासिक किल्यांच्या कुशीमध्ये वसलेले आहे. या नारायणपूर गावाचे मूळ नाव हे 'पूर' असे होते. या 'पूर' गावी प्राचीनतेची साक्ष देणारे एक सुंदर यादवकालीन मंदिर आजही उन पावसाचा मारा झेलत उभे आहे. नारायणपूर या गावाच्या पंचक्रोशी मध्ये उभे असलेले हे मंदिर सासवड पर्यंतच्या परीसरामध्ये 'नारायणेश्वर' या नावाने प्रसिद्ध आहे.

नारायणेश्वराचे मुख्य मंदिर.

 नारायणेश्वर मंदिराचे आवार.

एकेकाळी समृद्ध शिल्पांनी नटलेले हे गाव असणार हे नक्की हे या गावाच्या धाटणी आणि मंदिराच्या प्राचीनतेवरून लगेच लक्षात येते. नारायणपूरच्या या ‘नारायणेश्वर’ मंदिराचे दर्शन घ्यायचे असल्यास स्वतःच्या गाडीने किंवा स्वारगेट एस.टी. स्थानकातून 'नारायणपूर' या एस.टी. ने पोहोचता येते तसेच कापुरव्होळ आणि ऐतिहासिक नगरी सासवड येथून खाजगी जीप देखील आपल्याला मिळू शकतात. …