Posts

Showing posts from January, 2017

नांदुरी येथील अपरिचित पराक्रमाचे साक्षीदार असलेले 'वीरगळ'

Image
महाराष्ट्रामध्ये इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा लपलेल्या आहेत अश्या अनेक पाऊलखुणा या आपल्याला प्रत्येक गावोगावी दिसतात. या पाऊलखुणा कधी गावाच्या वेशीवर तर कधी कधी गावाच्या एखाद्या मंदिराच्या आवरात किंवा गावातल्या एखाद्या पारावर तसेच नदीच्या काठी या इतिहासाच्या खुणा विखुरलेल्या असतात. अश्यामध्ये बऱ्याचदा काही दगड हे शिल्पांनीयुक्त असतात. हे दगड गावामध्ये आजही लोकं पूजतात त्यामुळे ह्या इतिहास जपणाऱ्या पाऊलखुणा आपल्याला गावागावांमध्ये पाण्यास मिळतात. अश्याच गावांपैकी एक गाव म्हणजे 'नांदुरी' हे ऐतिहासिक गाव 'सप्तशृंग' गडाच्या आणि 'शिडका किंवा मोहिंद्री' किल्याच्या कुशीमध्ये वसले आहे. 
महाराष्ट्रातील अनेक गावांना संपन्न असा इतिहास लाभला आहे तर काही गावे हि आजही उपेक्षित आहेत. या उपेक्षित गावांमध्ये असलेल्या नांदुरी गावात वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ आपल्याला बघायला मिळतात. हे अपरिचित वीरगळ नांदुरी गावाच्या वेशीवर शेंदूर लेपन केलेल्या रूपामध्ये गावाच्या मुख्य चावडीवर उभे आहेत. आता यांचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर हे वीरगळ चारही बाजूने वेगवेगळ्या आकारात कोरलेले बघायला मिळतात.

नांदुर…

एक उपेक्षित दुर्ग नारायणगावचा 'नारायणगड'

Image
महाराष्ट्रातील किल्ले हे महाराष्ट्रातील एक मोठा वारसा. हा दुर्गांचा वारसा महाराष्ट्राइतका कोणत्या इतर राज्याला मात्र लाभलेला नाही. मुळातच महाराष्ट्राची भौगोलिक जडण-घडण बघता महाराष्ट्रात जे काही किल्ले उभारले गेले त्या प्रत्येक किल्याचे काहीना काही दुर्गस्थापत्याचे वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळते अश्याच काही किल्यांपैकी एक किल्ला उभारलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुणे-नाशिक महामार्गावर पुणे शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर आणि  नारायणगाव या गावापासून पूर्वेस ५ किलोमीटर अंतरावर दोन सुळके वजा डोंगर आपल्याला पुणे-नाशिक महामार्गावरून खुणावत असतात ते सुळकेवजा डोंगर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून 'नारायणगड' नावाचा एक उपेक्षित आणि दुर्लक्षित किल्ला आहे.


गडाच्या वाडीकडून नारायणगडावर येणारा रस्ता.

'जुन्नर' हे नाव प्राचीन काळापासून महाराष्ट्राच्या महत्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. या संपूर्ण शहर आणि परिसरात किल्यांचे एक जाळेच विणले आहे आणि यातील सर्व किल्ले हे एका पेक्षा एक सरस उभारले गेले आहेत. याच किल्यांच्या यादीत नाव येते ते 'नारायणगड' किल्याचे. 'शिवनेरी' किल्यापासू…