Posts

Showing posts from February, 2017

नदीकाठच्या प्राचीन संस्कृती

Image
मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट हि इतिहासाशी निगडीत असते. मात्र हे पण हे लक्षात घ्यायला हवे कि इतिहास म्हणजे काही नुसत्या सनावळ्या आणि लढायांची जंत्री नाही या इतिहासा आधी देखील इतिहास घडत होता तो म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाचा. मानवी वस्त्यांचे अवशेष आपल्याला संपूर्ण मानव जातीचा इतिहास आणि संस्कृती सांगत असतो. आपल्याला आजकालच्या शाळेमध्ये विशेषतः इयत्ता ३ री च्या पुस्तकामध्ये अश्मयुगीन माणसाची माहिती दिलेली आढळते मुले अभ्यासामध्ये अश्मयुग, नवअश्मयुग, ताम्रपाषाणयुग वगैरे शब्द पाठ करतात दगडाच्या कुऱ्हाडीची, रापींची, चित्रे पुस्तकात पाहतात; परंतु पुस्तकातील दगडी हत्यारांची केवळ चित्रे न बघता प्रत्यक्ष दगडी कुऱ्हाड जर पाहिली तर त्या शाळेतील मुलांना प्राचीन मानवी इतिहासाबद्दल माहिती समजायला नक्की मदत होते तसेच जर या विद्यार्थ्यांना. एखाद्या कोरड्या नदीच्या पात्रात अभ्यासाला नेले तर या विद्यार्थ्यांना देखील प्राचीन मानवी वसाहतीचे पुरावे पाहायला मिळतील आणि प्राचीन मानवाच्या वस्तीची स्थाने कशी पाहतात हे कसे ओळखायचे याबाबत नक्की माहिती मिळेल अश्याच प्राचीन मानवाच्या नदीपात्रातील वस्तीं…