Posts

Showing posts from March, 2017

दुर्गाव येथील 'दुर्योधन मंदिर'

Image
महाराष्ट्रामध्ये भटकंती करताना आपल्याला गावा गावात इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतात मग त्या कधी लेण्यांच्या रुपामध्ये असो किंवा एखाद्या जुन्या मंदिरांच्या रुपात किंवा एखाद्या गावाच्या मंदिराच्या बाहेर वीरगळ आणि सतीशिळेच्या रुपात इतिहासाच्या पाउलखुणा सांभाळत अनेक वर्षे महाराष्ट्रातील वेगवेगळी अनेक छोटी मोठी गावे हि आपला प्राचीन इतिहास सांभाळून आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 'दुर्गाव' आपले आगळे वेगळे महत्व आजही वर्षानुवर्षे जपून आहे ते म्हणजे महाभारतातील एका वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळे. आता महाभारतातील कोणते वैशिष्ट्य हे गाव सांभाळून आहे असा प्रश्न नक्की पडला असणार तर या गावात चक्क आपल्याला महाभारतातील 'दुर्योधनाचे मंदिर' बघायला मिळते.


आतमधून पोकळ असलेला कळस.
भारतामध्ये डेहरादून येथे जसे कौरवांची मंदिरे आहेत तसेच एक मंदिर महाराष्ट्रामध्ये 'दुर्गाव' या गावामध्ये आपल्याला बघायला मिळते. दुर्योधनाचे हे मंदिर गावाच्या अगदी सीमेला खेटून आहे. तसेच गावातल्या लोकांची दुर्योधनाच्या या मंदिरावर श्रद्धा देखील आहे. दुर्योधनाच्या मंदिराआधी मुख्य मंदिर हे शंकराचे आहे. हे…

महाराष्ट्राचा 'महावृक्ष'

Image
महाराष्ट्र देशात अनेक किल्ले, कोरीव गिरीशिल्पे (लेणी) यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल आहे आणि शिवाय नैसर्गिकता हि सह्याद्रीच्या पर्वतरांगाना अजून विविधता आणते पावसाळा सुरु झाला कि हे सह्याद्रीतील अलंकार भटक्यांना मोठ्या प्रमाणात खुणावयाला लागतात तसेच उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात या भौगोलिक रूपांची विविध रूपे आपणास बघावयास मिळतात. बऱ्याचदा सह्याद्रीमध्ये असलेले हे अलंकार कुठे अजस्त्र पाणलोट धबधब्याच्या रुपाने कोसळताना दिसतात तर ही सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर निर्गाने निर्मिती केलेले चमत्कार भटक्यांना साद घालत असताना दिसतात ह्याच सह्याद्रीच्या कुशीत ऐतिहासिक पेमगिरी किल्याच्या पायथ्याला आजही सुमारे २ ते ३ शतकांपासून आपले अस्तित्व टिकवून उभा राहिलेला महाराष्ट्राचा महावटवृक्ष शांत, निवांत परिसरात एखाद्या आजोबासारखा बसलेला आहे.

वटवृक्षाच्या रस्त्यावरून दिसणारा पेमगिरी किल्ला.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक गावांपैकी ऐतिहासिक वारसा लाभलेले एक गाव म्हणजे संगमनेर तालुक्यातील 'पेमगिरी’ हे गाव. या गावाची ऐतिहासिक ओळख म्हणजे 'पेमगिरिचा किल्ला अथवा भीमगड / शहागड. पेमगिरी किल्ला हा जशी ऐतिहास…