Posts

Showing posts from April, 2017

ठाणेकरांचा आवडता 'मासुंदा तलाव'

Image
तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे 'ठाणे शहर' हे स्वतःची एक वेगळीच ओळख आपल्याला दाखवते. या शहरामध्ये कामानिमित्त असो वा पर्यटनाला येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे ठाणे शहर नक्कीच जिवाभावाचे वाटते कारण ठाणे शहराची संकृती त्या येणाऱ्या माणसाला किंवा पर्यटकाला आपलीशी करते. असे हे 'ठाणे शहर' नक्की केव्हा वसले याचा निश्चित पुरावा नसला तरी ठाणे शहराचा आजूबाजूचा परिसर आणि इतिहास पाहता 'ठाणे शहर' हे नक्कीच प्राचीन आहे. अश्या या प्राचीन ठाणे शहरामध्ये आजही त्याच्या प्राचीनत्वाच्या खुणा दर्शवणारी ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात त्यापैकी एक महत्वाची प्राचीनत्वाची साक्ष देत असलेले ठिकाण म्हणजे ठाणेकरांना प्रिय असलेला आणि शहराची वेगळी ओळख करून देणारा 'मासुंदा तलाव'.
ठाणे स्थानकावर आपण कोणत्याही मार्गावरून आलो तरी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तलावाचे दर्शन घडते. असे हे तलावांचे असलेले प्राचीन काळातील 'श्रीस्थानक' किंवा आत्ताचे 'ठाणे शहर' किती सुंदर असेल याची कल्पना या तलावांच्या बांधणीवरून नक्की येते. ठाण्यामध्ये असलेले सर्व तलाव हे शिलाहार आणि बिंबकाळात बंधे…

सफर पुणे शहरातील 'वारसा स्थळांची'

Image
आज 'जागतिक वारसा दिवस' हा दिवस साजरा केला जातो तो जगातील महत्वाच्या आणि जुन्या स्थळांसाठी. या स्थळांमध्ये आपल्याला फार मोठी विविधता आढळून येते. प्राचीन काळातील स्थळे तसेच जगातील भौगोलिक आश्चर्याचा वारसा जपणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश. अशीच काही वारसास्थळे हि पुणे शहरामध्ये लपलेली आहेत. पुण्यातील काही वारसा हा प्राचीन आहे तर काही मध्ययुगीन आहे. वेगवेगळ्या कालखंडात घडवलेल्या या कलाकृती आजही पुण्याच्या जडणघडणीमधील त्यांचा वाटा मूकपणे इतिहासाच्या साक्षीदार बनून पर्यटकांना आपल्या अवशेषांंमधून दर्शवत आहेत. पुण्यातील वाढते शहरीकरण यामुळे हे इतिहासाचे मूक साक्षीदार आज पुण्यातील विविध जागांमध्ये आपल्या अस्तित्वाच्या खुणावत उभ्या आहेत.

मेट्रो सिटी झालेल्या या पुण्यामध्ये इतिहासाच्या काही पाऊलखुणा या मुळा, मुठा, आणि नाग या नद्यांच्या संगमावर आजही आपली आठवण करून देत उभ्या आहेत. या त्रिवेणी संगमावर ‘पुण्यक’ नावाचे प्राचीन तीर्थ होते. काळाच्या ओघात ‘पुण्यक’ या नावाचे ‘पुनवडी’ असे नाव झाले आणि याच ‘पुनवडी’ चे पुढे आजचे ‘मेट्रो सिटी आणि स्मार्ट सिटी’ बनलेले ‘पुणे’ शहर झाले. असा हा प्राचीन इत…

बाणेर गावातील 'बाणेश्वरची लेणी'

Image
पुणे शहर आणि परिसर फार झपाट्याने दिवसेंदिवस विकसित होत आहे. आता तर पुणे या विद्येच्या शहरामध्ये मेट्रो देखील दाखल झाली आहे. एवढ्या झपाट्याने शहराचा विकास चालू असताना देखील पुणे शहराच्या परिसरात प्राचीन वारसा आपले अस्तित्व आजही दाखवत आहे. पुणे शहर हे चारही बाजूने टेकड्यांनी वेढलेले आहे. या टेकड्यांनी वेढलेल्या पुणे शहरामध्ये काही लेण्या खोदल्या गेल्या या लेण्यांमध्ये 'पाताळेश्वर' ची लेणी सर्वश्रुत आहेच. तसेच पुणेकरांच्या लाडक्या 'पर्वती' येथील टेकडीवर देखील काही लेण्या खोदल्या गेल्या या लेण्यांसारखीच एक लेणी हि खोदली गेली ती पुण्याच्या सध्या झपाट्याने विकसित होणाऱ्या 'बाणेर' या गावी.
बाणेर गावातील तुकाई देवी मंदिर या मंदिराच्या थोड्याश्या खालच्या बाजूला 'बाणेश्वरची लेणी' आहेत.
पुणे आणि परीसरामध्ये इतिहासाच्या बऱ्याच पाउलखुणा लपलेल्या आहेत. या पाउलखुणांचा मागोवा घेताना आपल्याला खूप गोष्टी पाहायला मिळतात. बऱ्याचदा असेही होते कि या इतिहासाच्या  पाउलखुणा आपल्याजवळ असून देखील त्या माहिती नसतात किंवा आपले त्या ठिकाणी जाणे होत नाही त्यापैकीच बाणेर येथील 'ब…

निसर्गरम्य 'रामदरा'

Image
महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणे लपलेली आहेत ती आजही तेथे गेले कि मनाला भुरळ पडतात. मग यामध्ये मंदिर असो कि लेणी असो किंवा किल्ला हि सर्व ठिकाणे त्या त्या ठिकाणची माहिती सांगत आजही उभे आहेत. अश्याच काही ठिकाणांमध्ये थोडेसे आडवाटेवर लपलेले ठिकाण पुण्यापासून अगदी ४० कि.मी. अंतरच्या परिघात लपलेले आहे. आता हे कोणते ठिकाण असा प्रश्न आपल्याला नक्की पडू शकतो हे पुण्यापासून अगदी जवळ लपलेले ठिकाण म्हणजे  निर्सगरम्य असलेले 'रामदरा'.


रामदरा येथील शिवमंदिर आणि तळे.
पुण्याहून हडपसर मार्गे सोलापूर रस्ता पकडून लोणी येथून 'रामदरा' अशी आपल्याला पाटी दिसते त्या पाटीच्या शेजारून एक रस्ता आपल्याला 'रामदरा' या निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जातो. दोन्ही बाजूनी हिरवीगार शेते,मधुन मधून वस्ती, अरूंद पण पक्का डांबरी रस्ता आपले मन नक्कीच मोहवून टाकतो. 'रामदरा' मुळातच वैशिष्ट्यपूर्ण आहे ते त्याच्या नैसर्गिक दरीमुळे आणि तळ्यामुळे. या रामदऱ्याची सुंदरता पाहून मन हरखून जाते. 'रामदरा' येथील परिसर हिरवाकंच वनराई नटलेला असून आपल्याला वारंवार येण्यासाठी भुरळ घालतो. हिरव्यागार टेकडीच्या प…

शहाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा 'पेमगिरी'

Image
महाराष्ट्र देशामध्ये अनेक गड किल्ले यांची रेलचेल आपल्याला दिसून येते. हे सर्व किल्ले महाराष्ट्राचे मुकुटमणी असून ह्या किल्यांमुळे महाराष्ट्राला एक थोर इतिहास लाभलेला आहे. याच थोर इतिहासाची माहिती देत पुणे-अकोले मार्गावर शहाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा 'पेमगिरी' नावाचा एक छोटेखानी पण सुंदर किल्ला बाळेश्वर डोंगर रांगेत वसलेला आहे. हा किल्ला दिसायला जरी छोटेखानी असला तरी या किल्याच्या साथीने निजामशाही वाचवुन आपले स्वतंत्र असे प्रस्थापित राज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या शहाजी महाराजांनी जो लढा दिला होता तो या 'पेमगीरी' किल्ल्यावरुनच.

‘पेमगिरी’ किल्ला हा प्रथमदर्शनी आपणास बुचकळ्यात पाडतो.
अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात संगमनेर-अकोले मार्गावर एक छोटेसे पण अपरिचित ‘पेमगिरी’ नावाचे दुर्गरत्न 'कळस' या गावापासून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर लपलेले आहे. या आडवाटेवर असलेल्या ‘पेमगिरी’ या दुर्गरत्नावर जायचे असल्यास पुण्यावरून पुणे-संगमनेर-अकोले अशी बससेवा उपलब्ध आहे अपरिचित ‘पेमगिरी’ किल्ला इतिहासाची अत्यंत महत्वाची साक्ष देत उभा आहे. महाराष्ट्राचे आ…