Posts

Showing posts from October, 2017

पाषाणयुगातील 'महाराष्ट्र'

Image
आपला महाराष्ट्र हा मुळातच 'दगडांचा देश' आहे. महाराष्ट्राची भौगोलिक रचना पाहता येथे कोणताही माणूस हा आकृष्ट होईल. म्हणूनच पाषाणयुगीन माणूस हा देखील आपल्या महाराष्ट्राकडे आकृष्ट झालेला असावा महाराष्ट्रातील पुरातत्वीय उत्खननावरून किंवा ठिकठिकाणी पाषाणयुगीन मानवाच्या हत्यारांवरून आपल्याला समजते. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागामध्ये पाषाणयुगामध्ये मानवाने जी हत्यारे बनवली आहेत ती वेगवेगळ्या कालखंडातील हत्यारे खूप मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.  
मुळात पाषाणयुगीन मानवाचे अस्तित्व किंवा वास्तव्य हे महाराष्ट्रात होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न हा जवळपास १२५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष हे संशोधकांनी शोधण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रातील पाषाणयुगाचा पहिला पुरावा हा इ.स. १८६३ साली मराठवाड्यातील गोदावरी नदीकाठी वसलेले 'मुंगी पैठण' या गावी 'वायने' (Wayne) यांना सापडला . या 'मुंगी पैठण' या गावामध्ये त्यांना 'अकिक' वर्गाच्या पाषाणाच्या छीलक्या मध्ये  तयार केलेले एक हत्यार सापडले. हे सापडलेले हत्यार हे सुमारे ७ से.मी. लांब आणि २.५ से.मी. रुंद होते. हे हत्यार…