Posts

Showing posts from January, 2018

महाराष्ट्रातील 'बौद्ध लेण्यांची' कृष्णधवल छायाचित्रे

Image
आपल्या महाराष्ट्राचे प्राचीन कलास्थापत्य म्हणजे 'महाराष्ट्रातील लेणी'. जवळपास १२०० लेण्यांपैकी दोन तृतीयांश लेणी या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रातील प्राचीन स्थापत्यापैकी  'लेणी' या आपल्याला डोंगरामध्ये कोरलेल्या असल्यामुळे आजही व्यवस्थित टिकून आहेत. 'लेणी' बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे हि वास्तूशैली दीर्घकाल टिकावी हे याच्या मागचे मुख्य प्रयोजन होते. धार्मिक वस्तीसाठी डोंगरांमध्ये लेण्या खोदायची पद्धत सर्वप्रथम मौर्यांनी चालू केली. 'चक्रवर्ती सम्राट अशोकाने' गया येथून जवळ असणाऱ्या 'बराबर' टेकड्यांवर लेणी बांधली आणि मग हळूहळू या लेण्यांची शैली विकसित होत गेलेली आपल्याला पहावयास मिळते. महाराष्ट्रामधील पहिली लेणी हि 'भाजे लेणी' ओळखली जाते. 
आपल्या महाराष्ट्रात बेडसे, कार्ले, अजिंठा, वेरूळ, नासिक, कोंडाणे, जुन्नर येथे बौद्ध लेण्या आहेत ह्या सर्व महत्वाच्या लेण्यांची कृष्णधवल छायाचित्रे हि सत्तर च्या दशकात 'Owen .C. Kail(ओवेन सी. केल)' यांनी काढली आणि आपल्या 'Buddhist Cave Temples of India' या पुस्तकात प्रकाशित केली…