औरंगजेब काळातील पुण्याचे नाव 'मुहीयाबाद'


औरंगजेबाच्या कारकीर्दीचा आढावा हा आपल्याला 'मआसिर-इ-आलमगिरी' नावाच्या ग्रंथामध्ये सापडतो या ग्रंथामध्ये एका प्रसंगाचा उल्लेख केलेला आहे 'हिजरी सन १११४ मध्ये कोंडाणा किल्ला काबीज केल्यानंतरचा वर्षकाल 'मुहीयाबाद-पुणे' येथे घालविण्याचा औरंगजेब याने निश्चय केला' असा मजकूर दिलेला आपल्याला आढळतो. तसेच अजून एक महत्वाच्या ग्रंथात नोंद मिळते ती म्हणजे 'मआसिर-उल-उमरा' या ग्रंथामध्ये हा ग्रंथ हिजरी सन ११९४ (इ.स. १७८०) मध्ये लिहिला गेला आहे त्यामध्ये जी नोंद आहे ती पुढीलप्रमाणे:-

"कोंडाणा किल्ला काबीज केल्यानंतर, राजशक ४७ मध्ये वर्षकाल संपविण्याकरिता औरंगजेब मुहीयाबाद-पुणे' येथे आला". पुण्याचे नाव 'मुहीयाबाद' औरंगजेबाने ठेवायचे कारण म्हणजे औरंगजेबाचा नातू 'मूहि-उल-मिलत' हा पुणे येथे वारला त्याचे स्मारक म्हणून औरंगजेबाने पुण्याचे नाव 'मुहीयाबाद' असे ठेवले. याचे काही दाखले आपल्याला इतिहासात सापडतात त्याचे वर्णन खाफीखान विस्तृत पद्धतीने लिहितो. त्याचा सारांश 'इलियट आणि डॉसन' यांनी दिला आहे. 


खाफीखान याने केलेले वर्णन:-

"बअद ई फतह कूच फर्मूदे एखमा अय्यामे बरीशकाल दर्राहे पुना

"व मकामात हवेली कसबे मजकूर बराये आरामे लश्कर गुजारदन्द
"व आ मकानरा बिनाबर आंके शाहजादे मुहम्मद मुहीउल मिल्लत 
"खलफे सिदके पादशाहजादे मुहम्मद कामबक्ष के अज बतने
"रानी मनोहरपुरी बूद व जियादे बदहसाल तम्मतो जिदगानी 
"आरज न याफ्ते बे अजले थबीई मर्हले पैमाये जन्नतुल 
"मावा गशत दारान मकान मुत्तसिले मजारे फायिजुल अनवार 
"शेख सलाहुद्दीन मादफून गशत लिहाजा मुहीयाबाद मौसुम गर्दानीद 

याचा अर्थ खालीलप्रमाणे:-

"कोंडाणा (सिंहगड) किल्ला सर केल्यानंतर, सैन्यास कूच करण्याचा बादशहाने हुकुम दिला व पुण्याचे रस्त्यावरील व त्या शहराच्या आसपासचे गावी लष्करास विश्रांती देत वर्षकालापैकी एक महिना घालविला. पातशाहजादा महमंद कामबक्ष यास राणी मनोहरपुरी हिचे पोटी शाहजादा महमंद मूहि-उल-मिलत नावाचा मुलगा होता. त्याने या नश्वर जगातील सुखाचा अनुभव दहा वर्षाहून जास्त दिवस घेतला नव्हता. तोच तो आजारी पडला, व त्याने स्वर्गाचा मार्ग आक्रमिला. शेख सलाहुद्दीन याचे कबरीचे नजीक त्यास पुरण्यात आले. या गोष्टीमुळे बादशहाने पुण्याचे नाव मुहीयाबाद असे ठेविले."

'मूहि-उल-मिलत' याची कबर पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर बांधलेल्या शेख सल्ला दर्गा येथे आजही आहे फक्त ती कबर बघायला परमिशन लागते. अत्यंत सुंदर कला कुसर असलेली हि कबर नक्कीच पाहण्यासारखी आहे.

औरंगजेबाच्या नातवाची कबर 'छोटा शेख सल्ला दर्गा' पुणे या ठिकाणी असलेली कबर. 
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) पुणे नगर संशोधन वृत्त खंड २ रा इ.स. १९४३ (भारत इतिहास संशोधक मंडळ)

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०१८ महाराष्ट्राची शोधयात्रा


5 comments:

 1. पुणेश्वर मंदिर कुठे आहे पुण्यात ?

  ReplyDelete
  Replies
  1. पुण्येश्वर मंदिर पुण्यात कुंभार वेशीजवळ आहे पुण्येश्वर चौक आहे तिथे कुंभार वेशीजवळ.

   Delete
 2. खुप छान माहिती ☺☺☺

  ReplyDelete
 3. कबरी पेक्षा एखाद्या खांबाचा तळखडा जास्त वाटतोय

  ReplyDelete
 4. आठवणींच्या पाऊल खुणा म्हणजे नावे लिहून विद्रूप करणे नाही 🔊

  ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage