Posts

Showing posts from April, 2018

पुण्याच्या कसबा पेठेतील १५ व्या शतकातील 'गुंडाचा गणपती'

Image
पुण्याची कसबा पेठ हे नाव उच्चारले की आपल्याडोळ्यासमोर पहिले नाव उभे राहते ते पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असलेल्या 'कसबा गणपतीचे' आणि त्याच्या जवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या लाल महालाचे. अशी ही पुण्यातील सगळ्यात जुनी 'कसबा पेठ' आजही पुण्याचे ऐतिहासिक महत्व आणि अवशेष जपून आहे. याच प्राचीन आणि ऐतिहासिक कसबा पेठेमध्ये पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या 'कसबा गणपती' मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे तो १५ व्या शतकातील 'गुंडाचा गणपती'.पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या जवळून आणि शितोळे वाड्याशेजारून थोडे पुढे गेले की उताराचा रस्ता आपल्याला लागतो तेथून उजवीकडे वळाले असता सरळ जाऊन डावीकडे वळाले की सरळ आपण पोहोचतो ते थेट १५ व्या शतकातील 'गुंडाचा गणपती' या मंदिराच्या प्रांगणात. पेशवाईतील मुत्सद्दी 'नाना फडणीस' यांचा 'नागोजी गुंड' नावाचा सहकारी होता. ‘त्याच्या घराजवळील गणपती’ असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती‘ म्हणून प्रसिद्ध आहे.किंवा आळीला …

मंचर गावातील ऐतिहासिक वारसा 'चौदाव्या शतकातील बारव'

Image
पुणे नाशिक या हमरस्त्यावर बरीच ऐतिहासिक गावे वसलेली आहेत अश्याच ऐतिहासिक गावांपैकी एक गावं म्हणजे पुणे- नाशिक महामार्गावरचे एक प्रमुखगाव 'मंचर' हे होय. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडेल की 'मंचर' गावामध्ये काय इतिहास दडलेला आहे किंवा काय ऐतिहासिक गोष्ट झाली आहे असे अनेक प्रश्न नक्कीच तुम्हाला पडतील.  'मंचर' या गावामध्ये दडलेली आहे एक ऐतिहासिक 'चौदाव्या शतकातील बारव'. हि ऐतिहासिक 'बारव' मंचर गावामधील महत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे.
'मंचर' हे गाव आंबेगाव तालुक्यात येत असून या गावाची नोंद हि बदामीच्या चालुक्य राजा 'विनयादित्य' यांच्या इ.स. २९ एप्रिल ६९० च्या ताम्रपटात आलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये 'मंचर' या गावाचा उल्लेख हा 'मचोह' असा आलेला आपल्याला दिसतो तसेच अभ्यासकांचे देखील मत हेच आहे की हे गाव म्हणजे 'मंचर' असावे याबाबत एकमत आहे.
'मंचर' या गावाच्या पश्चिमेला हि सुंदर बारव इ.स. १३४४ मध्ये बांधली असून या बारवे मध्ये आपल्याला एक संस्कृत शिलालेख देखील बघायला मिळतो. ह्या बारवे बद्दल माहिती पाहण्याआ…