Posts

Showing posts from June, 2018

'दुर्ग किंवा किल्ल्यांबद्दलचे' प्राचीन उल्लेख

Image
'दुर्ग किंवा किल्ला' मानवजातीच्या इतिहासातील एक महत्वाचे अंग आहे. जेव्हापासून मानवाला आपल्या स्वतःची आणि मानावासोबत असणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेची जाणीव झाली तेव्हा मानवाने नैसर्गिक गुहांचा आधार घेतल्याचे पुराव्यानुसार स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशातील 'भीमबेटका गुहा' या त्याचे उत्तम उदाहरण आहे. मानव जसा जसा विकसित होत गेलेला दिसतो तसेच विविध कालखंडात जे निरनिराळे शोध मानवाच्या आयुष्यात लागले तसे तसे स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मानवाची गरज विविध कालखंडात वेगवेगळी झालेली दिसते. त्यामध्ये या 'दुर्गांचा' विकास झालेला आपल्याला पहायला मिळतो.
मध्ययुगामध्ये महाराष्ट्रातील किल्यांना खूप मोठे महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसते. या किल्ल्यांंच्यामुळे  मराठ्यांनी मुघल सैन्याला खूप मोठा प्रतिकार केला आणि संपूर्ण भारतावर एकछत्री अंमल असलेली 'मुघल राजवट' याच किल्यांच्या जोरावर नेस्तनाबूद झालेली आपल्याला इतिहासात पहायला मिळते. ह्याच 'दुर्गांबद्दल किंवा किल्ल्यांबद्दल आपल्याला प्राचीन संदर्भ पहाणे देखील गरजेचे ठरते. प्राचीन काळामध्ये देखील किल्ल्यांबद्दल …