Posts

Showing posts from August, 2018

निसर्गरम्य 'निळकंठेश्वर'

Image
पुणे हे जसे ऐतिहासिक शहर आहे तसेच पुणे हे देशातील प्रमुख आय. टी. शहरांपैकी एक प्रमुख शहर आहे. पुण्याची संस्कृती, पुणेरी बाणा हे सगळे या पुण्यात आहे. पुण्याची शान म्हणजे 'सिंहगड' आणि 'शनिवार वाडा'. लोक पुण्यात येतात परंतु त्यांना बाकीच्या लोकांकडून जे कळते ते म्हणजे शनिवारवाड्याबद्दलची माहिती आणि सिंहगडाबद्दल पण सारखे त्याच त्याच ठिकाणी फिरून कंटाळा आला कि नवीन नवीन ठिकाणांचा शोध घेत भटके फिरत राहतात.
मग अश्या भटक्यांसाठी आणि आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी पुण्याजवळ फिरायचा विकेंड ठरवणार असाल तर पुण्याजवळील थोडेसे वेगळे पर्याय देखील तुम्ही ठरवू शकता. असेच एक सुंदर ठिकाण पुण्यापासून हाकेच्या अंतरावर 'पानशेत' आणि 'वरसगाव' धरणांच्या निसर्गरम्य परिसरात एका उंच डोंगरावर ‘श्री क्षेत्रनिळकंठेश्वर’ वसलेले आहे. 
‘श्री क्षेत्रनिळकंठेश्वर’ येथे जाण्याचा रस्ता.
पुण्याहून निळकंठेश्वरला जायला एस.टी. ची सेवा आहे तसेच स्वतःची गाडी घेऊन जाणे देखील उत्तम पर्याय आहे. पानशेतच्या अलीकडे वसलेले ‘श्री क्षेत्रनिळकंठेश्वर’ एका उंच डोंगरावर आहे. डोंगर भटक्यांच्या दृष्टीने या डोंगरावर…