Posts

Showing posts from September, 2018

गुंजण मावळातील 'अमृतेश्वर मंदिर'

Image
महाराष्ट्रामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक मंदिरे उभारली गेली काही मंदिरे ही आजही महाराष्ट्रातील आडवाटांंवर असून देखील दुर्लक्षित आहेत. प्राचीन काळात किंवा मध्ययुगात या मंदिरांचे महत्व खूप होते असे आपल्याला त्यांच्या कोरीवकामावरून तसेच मंदिरांच्या बदलत जाणाऱ्या शैलींवरून समजून येते. असेच एक सुंदर मंदिर हे पुण्यापासून जवळच प्रसिद्ध असलेल्या 'बनेश्वर' मंदिरापासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर 'मोहरी' गावामध्ये असलेले 'अमृतेश्वर मंदिर'  आजही तसे उपेक्षितच आहे.

'मोहरी' गावामध्ये असलेले 'अमृतेश्वर मंदिर'
अमृतेश्वर मंदिराकडे जायचे असेल तर स्वारगेट बस स्थानकामधून 'तांभाड' या गावामध्ये जाणारी बस पकडावी ही 'तांभाड' पुण्यावरून नसरापूर येथून दीडघर, कतकावणे, हातवे बुद्रुक, तांभाड या गावामार्गे मोहरी या गावात यावे. पुणे - सातारा महामार्गावरून भोर फाट्यावरून आत वळावे आणि कासुर्डी गावाजवळील गुंजवणी नदीच्या जवळील अरुंद पुलास उजव्या बाजूला ठेवून हातवे, तांभाड मार्गे मोहरी गाव देखील आपल्याला गाठता येते. या गावाजवळून 'गुंजवणी नदी' व…