Posts

Showing posts from October, 2018

महाराष्ट्र देशाचे सौंदर्य 'सह्याद्रीमधील किल्ले'

Image
'सह्याद्री' हे नाव घेतले तर आपसूकच आपले मन जाऊन पोहोचते ते दऱ्या-डोंगर, हजारो वर्षे जुनी नदीची खोरी, विविध नैसर्गिक जंगले, विविध संस्कृतींचे शिल्लक राहिलेले अवशेष या सगळ्यांमध्ये आपले मन रमून जाते. सह्याद्रीचे खरे महत्व वाढवले ते तेथील वैशिष्ट्यपूर्ण गिरीदुर्गांनी आणि गिरीशिल्पांनी अश्या वैविध्य पूर्ण गोष्टींनी नटलेल्या ह्या सह्याद्रीला  हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेला आहे. सह्याद्रीमध्ये फिरताना अनेक नव्या नव्या गोष्टी आपणांस पहावयास मिळतात. सह्याद्रीतील पक्षी, प्राणी हे जसे आपल्याला सह्याद्रीत भटकताना सुखावून जातात तसेच येथील प्रत्येक दगड हा आपल्याला विविध गोष्टींचा इतिहास सांगायचा प्रयत्न करत असतो तो जाणून घेणे तेथे झालेल्या ऐतिहासिक गोष्टी या गावकऱ्यांच्या तोंडून ऐकण्यात जी मजा असते ती फार वेगळी असते. हे गावकरी म्हणजे या सह्याद्रीतले पाखरे त्यांच्या हातची चटणी भाकरी खाणे म्हणजे स्वर्गसुख असते.
महाराष्ट्रातील किल्यांवर भटकायला जाणे आणि तिथून वेगवेगळ्या अनुभवाने सह्याद्रीमधील डोंगररांगा पाहणे आणि अनुभवणे तसेच कधी वादळी पावसाचा तडाखा खात खात किल्यांवर पोहोचावे तेथून सह्या…