Posts

Showing posts from December, 2018

प्राचीन बौद्ध भिक्खूंचे लेण्यांमधील 'वर्षावास आणि उपोस्थ' यांचे महत्व

Image
महाराष्ट्रातील लेणी या सर्व जगभर प्रसिद्ध आहेत. या लेण्या कशासाठी बांधल्या? का बांधल्या हे प्रश्न नेहमी लोकांना सतावत असतात या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला बौद्ध धर्म आणि त्याचे तत्वज्ञान हे देखील जाणून घ्यावे लागते तरच आपल्याला या लेण्यांचे देखील महत्व समजण्यास मदत होते. तसे पहायला गेले तर बौद्ध धर्मात 'उपोस्थ' या गोष्टीला फार महत्व आहे. 'उपोस्थ' या शब्दाचा अर्थ 'जवळ बसणे' असा असून हा शब्द 'उप+स्था' या संस्कृत धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. 'जवळ बसणे' या शब्दाला बौद्ध धर्मात फार वेगळेपण आणि महत्वाचे सांगितले आहे. 
भिक्षूसंघाच्या एकसंधपणाच्या आणि शिस्तीच्या दृष्टीने  दोन विधी फार महत्वाचे मानले गेले आहेत. त्यातील पहिला विधी म्हणजे 'उपोस्थ किंवा उपोसथ विधी' हा होय. 'विनय महावग्गातील' वचनानुसार हा विधी मगध राज्याचा राजा 'बिंबिसार' याच्या सांगण्यावरून 'भगवान गौतम बुद्धांनी' आपल्या संघात स्वीकारला होता. जेव्हा 'भगवान गौतम बुद्ध' हे स्वत: 'राजगृह' म्हणजे आजचे बिहार मधील 'राजगिर' ये…

लावण्यवती 'मस्तानीची' उपेक्षित समाधी.

Image
महाराष्ट्रातील दऱ्या खोऱ्यात अनवट वाटांवर वारंवार भटकले तरी भटक्यांची मन हि कायम सह्याद्रीच्या पर्वत रांगांकडे ऐतिहासिक शहरांकडे आपोआप खेचली जातात. शनिवार-रविवार म्हणजे ‘डोंगर भटक्यांचे’ आवडते दिवस या दोन दिवसांचे प्लॅनिंग सुरु होते ते सोमवार पासूनच एक भटकंती थांबत नाही तोपर्यंत दुसऱ्या भटकंतीचे वेध लागलेले असतात. अश्याच अनवट भटकंतीसाठी विविध ऐतिहासिक स्थळे शोधणे अपरिचित वाटांवरून फिरणे आणि निसर्गाचा आणि इतिहासाचा मनमुराद आनंद लुटणे म्हणजे एक पर्वणीच असते. असेच एक सुंदर ऐतिहासिक ठिकाण आजही भटक्यांना खुणावत आहे ते म्हणजे पाबळ गावात असलेली ‘मस्तानीची समाधी’.

पुणे-शिरूर रस्त्यावर शिरूरपासून 'पाबळ' या गावी जाणारा फाटा फुटतो.पाबळ गावी जाण्यासाठी पुण्याहून एस.टी सेवा उपलब्ध आहे परंतु स्वतःचे वाहन असल्यास कधी पण उत्तम असते वाटेतले एखादे अपिरीचीत ठिकाण देखील बघायला मिळते त्याचाही मनसोक्त आनंद आपल्याला लुटता येतो. पुणे शिरूर रस्त्यावर असलेले 'पाबळ' हे गाव जरी इतर चार गावांप्रमाणे दिसणारं असलं तरी ऐतिहासिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचं आहे. 'बाजीराव पेशव्यांची' द्वितीय पत्नी अस…