Posts

Showing posts from January, 2019

अंधेरी येथील भौगोलिक आश्चर्य 'गिल्बर्ट हिल'

Image
आपला महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या देखील अतिशय संपन्न आहे. जसा महाराष्ट्राला इतिहासाचा वारसा आहे तसाच भौगोलिक वारसा देखील महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे. असाच एक महत्वाचा भौगोलिक वारसा आपल्याला पाहायला मिळतो तो संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी 'मुंबई' मध्ये. मुंबई मधील 'अंधेरी' हे इतिहास कालीन गाव. या गावाचा उल्लेख हा आपल्याला 'महिकावतीची बखर' यामध्ये देखील आढळून येतो याच मुंबईमधल्या आजच्या महत्वाच्या भागामध्ये 'गिल्बर्ट हिल' नावाचे एक भौगोलिक आश्चर्य आपल्याला पाहायला मिळते. मुंबई मधील 'अंधेरी' मधील भूशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेले 'गिल्बर्ट हिल' हा भाग याच भौगोलिक आश्चर्यामुळे प्रसिद्ध आहे.


'अंधेरी' मधील भूशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेले 'गिल्बर्ट हिल'.
'मुंबई' शहरामध्ये जश्या प्राचीन लेणी, मंदिरे, आणि किल्ले आहेत तसेच 'मुंबई' या मायानगरी मध्ये भौगोलिक आश्चर्यदेखील मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यातील जी काही भौगोलिक आश्चर्य हि विकास काम आणि मोठ्या प्रमाणात शहरीकरण यामध्…

ऐतिहासिक सासवड मधील 'बाळाजी विश्वनाथ भट पेशवे' यांची समाधी

Image
प्राचीन काळापासून महत्वाचे ठिकाण असलेले 'सासवड' प्रसिद्ध आहे ते मुळात सोपानदेवांच्या समाधीमुळे. पुरंदर किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या 'सासवड' गावाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले ते मध्ययुगात. पुण्यापासून अगदी जवळ असलेले ठिकाण हे आजही महत्वाचे ठिकाण आहे ते तेथील बाजारपेठेमुळे. 'कऱ्हा नदी आणि चांंबळी नदी' यांच्या संगमावर उभे असलेले 'संगमेश्वर मंदिर' म्हणजे सासवड गावातील अत्यंत महत्वाचे स्थान याच मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला 'कऱ्हाबाईचे' देखील मंदिर पाहायला मिळते. याच 'कऱ्हाबाई मंदिराच्या' शेजारी 'भट' घराण्याच्या पेशवाईचे संस्थापक 'बाळाजी विश्वनाथ भट' यांची समाधी आहे.
'बाळाजी विश्वनाथ भट' यांचे पणजे 'महादजीपंत भट' इ.स. १५७५ साली श्रीवर्धनच्या देशमुखीचा कारभार पाहत असत. 'महादजी पंत' यांचा जो मुलगा होता 'परशुराम पंत' हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे चाकरीसाठी येणारे पहिले गृहस्थ. 'परशुराम पंत' यांच्याकडे सरदारकी होती. 'परशुराम पंत' यांचे चिरंजीव 'विसाजीपंत' हे देखील सरद…