Posts

Showing posts from February, 2019

सेनापती बापट रोडवरील डोंगराच्या कुशीत वसलेले 'चतु:शृंगी मंदिर'

Image
पुणे आणि परीसराला चारही बाजूंनी टेकड्यांचे नैसर्गिक कोंदण लाभलेले आहे. या संपूर्ण टेकड्यांवर आपल्याला कोणते ना कोणते मंदिर हे पहायला मिळतेच. असेच ‘चतुशृंगी देवीचे’ मंदिर हे पूर्वीच्या पुण्यापासून साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर वसलेले असून पुण्यातील अत्यंत महत्वाचे हे देवस्थान आहे. आजच्या नविन पुण्यामध्ये हे मंदिर पुण्यातील सेनापती बापट या प्रसिद्ध आणि मोठ्या रस्त्यावरून डोंगराच्या कुशीत वसलेले आपल्याला पहायला मिळते. काळानुसार मंदिराच्या परिसराचा देखील मोठा कायापालट झालेला आहे.
मोठ्या मोठ्या इमारती आणि आय.टी पार्क यांच्या घेऱ्यामुळे हे ‘चतुशृंगी मंदिर’ आज मात्र लपलेले आहे परंतु या डोंगरावरील देवीच्या मंदिरात जायला सेनापती बापट रस्त्यावरून कमान आणि पायऱ्या देखील आज बांधल्या गेल्या आहेत त्यामुळे मंदिरामध्ये सहज जाता येते. १९६१ पूर्वी चतुशृंगी देवीच्या मंदिरात जायचे झाल्यास कृषीविद्यापीठावरून पुणे विद्यापीठाच्या रस्त्याने यावे लागत असे. इ.स. १९६१ साली जेव्हा पानशेतचा पूर आला त्याच्यानंतर येथे गोखले नगर वसवले गेले आणि पानशेत पुराच्या वेळेस ज्यांचे घर उध्वस्त झाले त्यातील बरीचशी पुणेकर मंडळी या…