Posts

Showing posts from March, 2019

सुलतान आणि 'संगीत'

Image
महाराष्ट्राचा मध्ययुगाचा इतिहास पाहिला तर तो आपल्याला रक्तरंजित दिसतो परंतु याच काळामध्ये भारतीय आणि मुसलमान 'संगीत पद्धती' यांचा मेळ होत होता असे दिसते. यासाठी आपल्याला थोडा पूर्व इतिहास पाहणे देखील फार महत्वाचे ठरते. इ.स. ७१२ साली जेव्हा मुहम्मद बिन कासीम याने सिंध प्रांतावर आक्रमण केले तेव्हा त्या युद्धात फार मोठी कत्तल घडवली गेली तसेच खूप मोठा विध्वंस देखील केला गेलेला होता. मुहम्मद कासीम याने नेमलेले अरब सैनिक तेथेच स्थायिक झाले आणि त्यांनी भारतीय स्त्रियांशी लग्ने केली आणि तिथे मुसलमानी वसाहती बनण्यास सुरुवात झाली. मन्सुरा, कुजदार, कदावेल, वैजा, मह्फुजा आणि मुलतान येथील वसाहती विद्येची आणि संस्कृतीची केंद्रे बनली.

याच काळामध्ये मुसलमानांच्या मध्ये खारिजी, जिंदिक, ख्वाजा, शरिया, मुजाहिद, करमातिया असे धार्मिक संप्रदाय निर्माण झाले. हे सगळे संप्रदाय आपल्या आपल्या मतांचे प्रचार सर्वत्र करू लागले. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला कि अरबी मुसलमान यांच्यामध्ये आजिबात एकी राहिली नाही. आणि इ.स. ८७१ मध्ये सिंध प्रांत हा खालीफांच्या शासनातून मुक्त झाला आणि स्थानिक अरब वसाहती मधल्…