Posts

Showing posts from April, 2019

नसरापूर येथील उपेक्षित वारसास्थळ 'स्वराज्य स्मारक स्तंभ'

Image
आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गावांमध्ये विविध वारसा लपलेला आहे. अशी हि महत्वाची वारसा  स्थळे येता-जाता वाटेवर असूनही ती सहजपणे दुर्लक्षित होतात असेच एक वारसा स्थळ हे 'पुणे - सातारा' रस्त्यावर 'राजगडकडे' जाणाऱ्या 'नसरापूर' बसस्थानकाच्या शेजारी असून हे वारसा स्थळ चारही बाजूने कुंपण असलेल्या एका जागेमध्ये आहे. या चारही बाजूने कुंपण असलेल्या जागेमध्ये एक 'स्मारक स्तंभ' आपल्याला पाहायला मिळतो तोच हा 'स्वराज्य स्मारक स्तंभ' होय.

बऱ्याचवेळेस अनेक लोक या 'चेलाडी किंवा नसरापूर' फाट्यावरून राजगडाकडे जातात परंतु हा स्तंभ कायम खुणावतो परंतु कोणी या स्मारक स्तंभाकडे फिरकत देखील नाही. तसेच हा स्मारक स्तंभ का उभारला कशासाठी उभारला याबाबत मात्र लोकांना माहिती नसल्यामुळे हे ठिकाण अजून दुर्लक्षित होते. आज आपण या 'स्वराज्य स्मारक स्तंभाबद्दल' माहिती पाहणार आहोत.

'श्रीमंत बाबासाहेब पंतसचिव' यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे स्मारक म्हणून हा दगडी स्तंभ उभारला.
हा 'स्वराज्य स्मारक स्तंभ' भोर संस्थानचे अधिपती 'श्रीमंत बाबासाहेब…

शमीच्या वृक्षाखाली असलेला 'गुपचूप गणपती'

Image
पुणे शहरात फिरण्यासाठी बरीच छोटी मोठी मंदिरे आहेत. काही प्राचीन मंदिरे देखील आपल्याला पुण्यामध्ये बघायला मिळतात तर शिवकालीन आणि पेशवेकालीन मंदिरे देखील आपल्याला बघायला मिळतात. असेच एक सुंदर मंदिर उत्तर पेशवाई मध्ये पुण्यातील शनिवार पेठेत आपल्याला पहायला मिळते. हे मंदिर म्हणजे‘वरदमूर्ती देवस्थान’ याच गणपतीला आजूबाजूला लोकं ‘गुपचूप गणपती’ म्हणून ओळखतात. 
आपण जेव्हा शनिवारवाड्याकडून ओंकारेश्वरकडे जायला निघतो तिथेच उजव्या बाजूला आपल्याला एक पोलीस चौकी लागते त्या पोलीस चौकीला लागूनच काही जुने आणि प्रसिद्ध घाट आहे त्यापैकी एक ‘नेने घाट’ तर खूप प्रसिद्ध आहे याच नेने घाटाकडे जाणाऱ्या उजव्या उजवीकडील रस्त्यावर आपण वळालो कि आपल्याला समोर दिसते ते दगडी चौकटीचे प्रवेशद्वार असलेले ‘गुपचूप गणपती मंदिर म्हणजेच श्री वरद गणपती देवस्थान’.

गुपचूप गणपती देवस्थान पाटी.
शनिवार पेठेमध्ये असलेले हे मंदिर भर वस्तीच्यामध्ये आहे. या मंदिराच्या सुंदर दगडी चौकटीच्या दिंडी दरवाज्याच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये गेले असता आपल्याला आत दोन्ही बाजूस देवड्या पहायला मिळतात. येथून तीन दगडी पायऱ्या उतरून आत गेले कि एक छोटेसे …