Posts

Showing posts from August, 2019

नासिक कि नाशिक?

Image
प्रत्येक गावाला किंवा शहराला त्याचा एक इतिहास असतो तसेच त्या गावाला किंवा शहराला त्याचे मूळ नाव देखील असते. 'नासिक शहर' देखील असेच प्राचीन आहे. मुळात सध्या सगळे लोकं 'नासिक' या शहराच्या नावाचा उल्लेख हा 'नाशिक' असा करतात परंतु या शहराचे मूळ नाव 'नासिक' असेच आहे. दक्षिणेकडची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'गोदावरी नदीचा' उगम हा त्र्यंबक गावाला लागून असलेल्या 'ब्रम्हगिरी' पर्वतावर होतो. 'नासिक' शहरात शिरताना गोदावरी नदीचे पात्र फार विस्तारलेले दिसते. मुळात 'नासिक' शहर हे भारतातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
प्राचीन काळामध्ये 'नासिक' शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक, तसेच पद्मनगर असे देखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकाराण्यातील 'जनस्थान' म्हणजेच 'नासिक'. 'नासिक' मधील 'पंचवटी' म्हणजे पाच ऋषीकुमारांचे प्रतिक असून हे शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या पावनस्पर्शाने मुक्त झाल्याचे मानतात अशी एक कथा आहे. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्…