Posts

Showing posts from October, 2019

दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडाचे नामाभिधान' याचा मागोवा

Image
पुणे, ठाणे आणि नगर या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला 'हरिश्चंद्रगड' हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. या गडासंबंधित बऱ्याच पौराणिक आख्यायिका आहेत तसेच गडावर प्राचीन मंदिरे देखील आहेत. हा 'हरिश्चंद्रगड' मुळातच प्रसिद्ध आहे तो त्याच्या नैसर्गिक 'कोकणकड्यामुळे'. त्यामुळे या ऐतिहासिक 'हरिश्चंद्रगडावर' कायमच दुर्गभटक्यांची गर्दी असते. याच 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला १३ व्या शतकातील मंदिरे देखील पहावयास मिळतात. अश्या या 'हरिश्चंद्रगडाचे' नामाभिधान' कसे पडले हा प्रश्न नेहमी सर्व लोकांना पडतो त्यासाठी एक आख्यायिका कायम सांगितली जाते. ती सत्यवान 'हरीश्चंद्र' राजाची परंतु त्याला कोणताही पुरावा मिळत नाही.
'हरीश्चंद्र' हा मुख्यत्वे पौराणिक परंपरेनुसार सुर्यवंशातील 'त्रिशंकू' याचा मुलगा. त्याची राजधानी हि 'अयोध्या' होती. या 'हरिश्चंद्र' राजाने दक्षिण भारतामध्ये असलेल्या 'अहमदनगर जिल्ह्यात' किल्ला का बांधावा? हा देखील मोठा प्रश्न आहे. या संबंधात आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणे फार महत्वाचे ठरेल…