पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील शेक्सपिअर यांनी काढलेली '१९१५ मधील छायाचित्रे'


बऱ्याचवेळेस आपण इंटरनेट आणि संग्रहालये पाहायला गेलो कि विविध काळातील जुनी छायाचित्रे देखील पाहतो अशीच काही छायाचित्रे हि १९१६ साली किंवा त्याच्या थोड्या आधी हि ब्रिटीश अधिकारी 'कर्नल एल. डब्ल्यू. शेक्सपिअर' हे जेव्हा पुण्यामध्ये बदली होऊन आले होते तेव्हा त्यांनी काढली. 'कर्नल  एल. डब्ल्यू. शेक्सपिअर' हे स्वत: ब्रिटीश आर्मी मध्ये 'Assistant Quartermaster-General 6th Poona Division' या हुद्द्यावर होते. तसेच त्यांनी. 'History of The 2ND K.E.O. GOORKHAS' आणि 'History of  Upper Assam and North-East Frontier' हि पुस्तके त्या काळामध्ये लिहिली आहेत. 

त्यांच्या पुस्तकाच्या मनोगतामध्ये ते पुढीलप्रमाणे लिहितात:-

Knowing there must be many others far more knowledgeable than myself in these matters of local history, I venture on this subject with diffidence in the hope that, though an abler pen might have made more of it, and in spite of its faults; it may prove of interest to those whose lives are cast in this historic locality.

                                                                                                      L.W. SHAKESPEAR.

       Poona,
September 1915.

या छायाचित्रांच्यामध्ये आपल्याला जुन्या पुण्याची सफर घडते. त्यामध्ये जुने पुणे आणि परिसर, पाताळेश्वर लेणी, पर्वती, शिंदे छत्री, सिंहगड, नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील मूळ समाधी, पुरंदर, चाकणचा किल्ला, लोहगड किल्ला, भाजे लेणी, कार्ले लेणी, खडकवासला धरण  इंदुरीची गढी, पुरंदरे वाडा, संगमेश्वर मंदिर या सगळ्यांची सुंदर छायाचित्रे पाहायला मिळतात. हि छायाचित्रे पुढीलप्रमाणे:-


या फोटोमध्ये जे घर दिसत आहे त्याच्या आजूबाजूला जुना कँन्टोनमेंटचा परिसर होता आणि हे घर त्याकाळात  देखील या परिसराला पुण्यातील लोकं हि 'गारपीर म्हणून ओळखत असत.

     
       पुणे स्टेशन जवळ असले इंग्रजांची जुनी दफनभूमी. हि दफनभूमी आजही आपल्याला पाहता येते. तसेच सेंट पाॅॅल्स चर्चकडे जाताना हि दफनभूमी लागते.

    नानापेठेतील गारपीर जवळ असलेले दगडी बांधकाम.

जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर लेणी समोरील बाजूने.

 जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर लेणी तसेच त्याच्यासमोर असलेली विहीर आणि लेणीच्या मंडपाच्या बाजूने असलेली झाडे आपल्याला पाहायला मिळतात.


वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री.

वानवडी येथील महादजी शिंदे  यांच्या  छत्रीचा राजस्थानी कलाकुसर असलेला दरवाजा.

हिराबाग येथून दिसणारी पर्वती आणि परिसर. 

कोरेगाव भीमा येथील स्तंभ.

  चाकणच्या संग्रामदुर्गाचा दरवाजा.

  संग्रामदुर्ग किल्ल्याचा बुरुज.

चाकणच्या संग्रामदुर्गचा दुसरा बुरुज आणि तटबंदी.

भोसरी गावामध्ये असलेले महापाषाणयुगीन मानवाची दफनभूमी असलेले शिलावर्तुळ.


सिंहगड किल्ल्याचा कल्याण दरवाजा याचे हे चित्र असून लेखकाने चुकून त्याचा उल्लेख हा कोकण दरवाजा केला आहे.


नरवीर तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील समाधी.

सिंहगडाचा पुणे दरवाजा.

 खडकवासला धरणाचे दृश्य.

सरदार पुरंदरे यांचा वाडा आणि त्याचे मुख्य प्रवेशद्वार.

पुरंदर किल्ल्याचे दृश्य.

पुरंदर किल्ल्यावरून दिसणारे वज्रगडाचे दृश्य. तसेच पुरंदर किल्ल्यावर असलेल्या इमारती देखील या छायाचित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत.

सासवड गावामध्ये असलेले संगमेश्वराचे सुंदर मंदिर.

सासवड येथील पुरंदरे वाड्याच्या आतमध्ये असलेले सुंदर मंदिर आणि वाड्याचा बुरुज.

लोणावळ्याजवळील कार्ले लेणी येथील चैत्य.

कार्ला लेणी चैत्य प्रवेशद्वार आणि एकविरा देवी मंदिर.

भाजे लेणीमधील स्तूप.

इंदुरीच्या गढीचे मुख्य प्रवेशद्वार.

  इंद्रायणी नदीच्या काठावर बांधलेली सेनापती खंडेराव दाभाडे यांची इंदुरीची गढी.

लोणावळ्याजवळील लोहगडाच्या वरच्या दरवाज्यातून काढलेले छायाचित्र.

 लोहगडाच्या वाटेवरून दिसणारे लोहागड किल्ल्याचे नैसर्गिक नेढे. लेखकाने जो फोटो काढला आहे त्याने जि या नैसर्गिक नेढ्याबद्दल आख्यायिका ऐकली ती त्याने वर लिहिली आहे.


लोहगडावरील दर्गा.

लोहगडावरील विंचूकाटा माची.

(टीप:- छायाचित्रे हि A Local History of Poona And Its Battlefields या पुस्तकातील आहेत. तसेच सगळी छायाचित्रे हि Col. L.W. Shakespear. यांनी काढलेली आहेत.)
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) A Local History of Poona And Its Battlefields:- Col. L.W. Shakespear, Macmillan and Co. Limited, 1916.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

15 comments:

  1. Replies
    1. आपली व आमची भेट या वयात झाली . लवकर झाली असती tar

      असो
      हेही नसे थोडके

      धन्यवाद

      Delete
  2. अत्यंत दुर्मिळ संग्रह.....

    ReplyDelete
  3. चांगली ,माहिती. छान !

    ReplyDelete
  4. अप्रतिम माहिती.

    ReplyDelete
  5. जुन ते सोन आपला वारसा जपुन ठेऊया. जय महाराष्ट्र,

    ReplyDelete
  6. खुपच सुंदर फोटो आहे. मी खुद्द लोहगड चा स्थानिक आहे . लोहगड किल्ल्यचे जूने फोटो पाहिले . आजचा किल्ला आणि या जुन्या फोटो मध्ये खूप बदल झाला आहे.

    ReplyDelete
  7. Very nice Collection I would like to showcase and share these pictures on my instagram profile.

    ReplyDelete
  8. मस्तच, जुने पुणे पहायला मिळाले. पाताळेश्र्वर तर झाडांमध्ये हरवल्यासारखे वाटेल एवढी झाडे होती.

    ReplyDelete
  9. फारच सुंदर संग्रह!!���� जुने पुणे पाहण्याची इच्छा काही प्रमाणात पुर्ण झाली तुमच्या या लेखामुळे!! :)

    ReplyDelete

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage