Posts

Showing posts from January, 2020

महाराष्ट्रातील किल्यांवरचा 'पुष्प महोत्सव'

Image
नुकताच श्रावण संपलेला असतो हिरवाई सगळीकडे बहरलेली असते सुंदर छोटे छोटे झरे खळखळ करत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत वाहत असतात. सगळीकडे प्रसन्न वातावरण असते आणि या प्रसन्न वातावरणात छोटी छोटी सुंदर रानफुले आपले डोके वर काढून सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर उमलायला लागली असतात. अश्या या डोंगर माथ्यावर उगवलेल्या रानफुलांनी सह्याद्रीचे 'शिरोमणी' असणारे 'किल्ले आणि उत्तुंग शिखरे' यांच्या डोक्यावर पिवळ्या, लाल, निळ्या अश्या विविध फुलांचा 'मुकुट' या किल्यांनी आणि शिखरांनी आपल्या डोक्यावर चढवलेला असतो. हा पुष्पमहोत्सव म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
अश्या या फुलांचा महोत्सव पहायचा असेल तर कोणत्याही किल्यावर जावे आणि मनमुराद भटकावे ह्या फुलांच्या महोत्सवात प्रत्येक किल्ला हा आपले वेगळे रूप दर्शवत असतो. आपल्या सह्याद्रीवर निसर्गाने भरपूर माया केली आहे या मायेचे एक सुंदर रूप आपल्याला सह्याद्री मध्ये उमलणाऱ्या सुंदर सुंदर फुलांमधून आपल्याला पाहायला मिळते अनुभवायला मिळते. सह्याद्रीत उमलणाऱ्या फुलांचे एक अद्भूत जग आपल्याला अनुभवायचे असेल तर सह्याद्रीतील अनवट किल्ले, मोठी …