Posts

Showing posts from February, 2020

डोंगर भटक्यांचा आवडता ट्रेक 'कात्रज ते सिंहगड'

Image
पुणे आणि परिसराला भौगोलिक दृष्ट्या चारही बाजूने टेकड्या लाभलेल्या आहेत तसेच या सर्व टेकड्यांमध्ये  मानबिंदू असलेला ऐतिहासिक सिंहगड किल्ला हा देखील पुण्यापासून अगदीच हाकेच्या अंतरावर असल्यामुळे पुणेकरांचे अत्यंत लाडके स्थान आहे. सिंहगडावर जाण्यासाठी प्रचलित मार्ग प्रसिद्ध आहेत परंतु ज्यांना गिर्यारोहणासाठी हिमालयात जायचे असेल किंवा स्वत:चा स्टॅॅमिना पहायचा असेल तर पुण्यातील किंवा मुंबईमधील डोंगर भटक्यांचा अत्यंत आवडता ट्रेक असतो तो म्हणजे 'कात्रज ते सिंहगड'.
आता 'कात्रज' म्हटले कि पुणेकरांना पहिले दिसते ते कात्रजचे 'सर्पोदयान' किंवा कात्रज येथील प्रसिद्ध 'दुध डेअरी'. मात्र 'कात्रज घाटाचे' नाव जरी घेतले तरी प्रत्येक पुणेकराच्या तोंडी येतो तो शिवाजी महाराजांचा पराक्रम. जेव्हा शाईस्ताखान याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिनांक ६ एप्रिल १६६३ रोजी चैत्र शु. अष्टमीच्या दिवशी रात्री लाल महालावर छापा घातला. शिवाजी महाराजांच्या अचानक केलेल्या या हल्ल्यामध्ये शाईस्तेखानाची तीन बोटे मात्र तुटली. थोडक्यात त्याचे मरण या तीन बोटांवर निभावले. छत्रपती शिवाजी …

रामचंद्रदेव यादव याचा पूर येथील 'गद्धेगाळ'

Image
महाराष्ट्रामध्ये आपल्याला जागोजागी इतिहासाच्या पाउलखुणा या विखुरलेल्या आढळून येतात. यामध्ये प्राचीन मंदिराचे अवशेष, वीरगळ, प्राचीन देवी देवतांच्या मूर्ती, तसेच गद्धेगाळ असे विविध काळातील अवशेष हे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावांमध्ये पाहायला मिळतात. असाच एक महत्वाचा गद्धेगाळ हा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या 'पूर' गावामध्ये नारायणेश्वर मंदिराच्या इथे होता. सध्या हे प्राचीन काळातील 'पूर' गाव नारायणपूर म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. सध्या हे 'नारायणपूर' गाव एकमुखी दत्ताचे फार प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनलेले आहे. 
किमान ८०० वर्षे जुने असलेले 'पूर' गावातील 'नारायणेश्वराचे' यादवकालीन मंदिर अत्यंत सुरेख आहे. भूमिज स्वरूपातील हे मंदिर कलाकुसरीने भरलेले आहे. याच यादवकाळातील 'नारायणेश्वर' मंदिराच्या बाहेर एक गद्धेगाळ होता. नंतरच्या काळामध्ये हा गद्धेगाळ 'भारत इतिहास संशोधक मंडळात' आणला आणि त्याचे जतन केले गेले तसेच त्याच्यावरील शिलालेखाचे वाचन हे थोर संशोधक 'डॉ. श्री. ग. ह. खरे' यांनी गद्धेगाळाचे वाचन केले आहे. सध्या…

'मुंबई' शहरामध्ये जेव्हा रेल्वे येते.

Image
मुंबई मध्ये रेल्वेसाठी लोहमार्ग टाकण्याची सुरुवात हि दिनांक ३१ ऑक्टोबर १८५० रोजी सायन(शीव) येथे नामदार जे.पी.विलधबी यांच्या हस्ते करण्यात आले आणि दिनांक १६ एप्रिल १८५३ या दिवशी संपूर्ण भारतात रेल्वे पहिल्यांदा धावली आणि भारताने यंत्रयुगात प्रवेश केला. जेव्हा मुंबईमधून रेल्वे धावणार होती तेव्हा रेल्वेचे काम चालू असताना मुंबई आणि परिसरात 'रेल्वेच्या' स्वरूपाबद्दल खूप गमतीदार चर्चा चालत असे. 'बैल किंवा घोडे' नसलेले वाफेचे येणारे यंत्र कसे चालणार. लोखंडी रस्ते कसे करणार? काही लोकांना तर असाही प्रश्न पडला होता की ही 'भुताटकी' तर नाही ना? अशी देखील लोकांची चर्चा होत असे. 
मुंबई आणि ठाण्यामधल्या काही लोकांनी अशीही अफवा लोकांमध्ये पसरवली होती की 'लोखंडी सडके वर चालणारी ही वाफेवरची गाडी संपूर्ण भारताला खूप मोठा शाप आहे. 'गोविंद नारायण माडगावकर' यांनी त्यांच्या 'मुंबईचे वर्णन' या पुस्तकात देखील काही किस्से असे लिहिले आहेत की 'जेव्हा लोखंडी सडका बांधण्यास प्रारंभ झाला तेव्हा देखील कित्येक लोकांच्या मनात विकल्प आणण्याचे प्रयत्न मांडिले. कोणी अशी गप…