Posts

Showing posts from March, 2020

किल्ल्यांची भटकंती का करावी?

Image
आपल्या महाराष्ट्राला वरदान लाभले आहे ते सह्याद्रीच्या डोंगररांगांचे. या डोंगर-शिखरांच्या भूमीत जायचे म्हणजे मुळात आपल्या मनात असावी लागते ती दुर्दम्य इच्छाशक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि अज्ञात वीरांच्या बलिदानाने पवित्र झालेले हे डोंगर पाहणे म्हणजे तेथील इतिहासाशी एकरूप होऊन जाणे. एखाद्या उघड्या-बोडक्या डोंगरावर जाणे आणि शिवस्पर्शाने पावन झालेला किल्ला पाहायला जाणे याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. 'पुरंदर किल्ला' पहायचा आणि 'मुरारबाजी देशपांड्यांच्या' पराक्रमाचे विस्मरण पडू द्यायचे हे कसं शक्य आहे? 'पन्हाळगड' हा किल्ला अवघ्या साठ मावळ्यांसह 'कोंडाजी फर्जंद' यांच्या नेतृत्वाखाली  जिंकून घेतला हि घटना विसरून म्हटले तरी जमणार नाही. ज्या 'नरवीर तानाजी मालुसरेंनी' स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी प्राणार्पण केले त्या सिंहगडावर जाऊन आज आपण काय करतो फक्त मजा?
अर्थात या गोष्टींचा आपण अतिरेक देखील करून चालत नाही. बऱ्याचदा किल्यांवर भ्रमंती करताना डोळे गाळणारे अनेक महाभाग किल्यांवर भेटतात तसेच शिवशाहीच्या इत…

मुठा नदीच्या काठावर असलेला दुर्मिळ 'वाळूंज वृक्ष'

Image
महाराष्ट्रात अश्या बऱ्याच भौगोलिक गोष्टी आहेत कि ज्या बऱ्याचवेळेस आपल्या नजरेमधून सुटतात बघायच्या राहतात. अश्या या भौगोलिक गोष्टी बऱ्याचवेळेस आपल्या अगदी जवळ असतात पण आपण त्या बघत नाही. पुण्यामध्ये असाच एक मुठा नदीकाठाच्या बाजूला असणारा 'वाळूंज' नावाचा  दुर्मिळ वृक्ष आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. पुणेकर रोजच या 'वाळूंज' वृक्षाच्या आजूबाजूने जातात परंतु फार कमी लोकांची नजर या वृक्षाकडे जाते किंवा वनस्पती अभ्यासकांशिवाय कोणाला तो जास्त माहिती देखील नाही.

दुर्मिळ असलेला 'वाळूंज' वृक्ष हा यशवंतराव चव्हाण पुल म्हणजेच (टू व्हीलर ब्रीज) हा कर्वे रस्त्याच्या उताराच्या इथे जोडलेला आहे तिथेच हा दुर्मिळ वाळूंज वृक्ष आपल्याला बघायला मिळतो. या दुर्मिळ असलेल्या 'वाळूंज' वृक्षाच्या आजूबाजूला आपल्याला शिरीष, बाभूळ हे देखील वृक्ष पहायला देखील मिळतात. पुणे शहरामध्ये असलेल्या या दुर्मिळ 'वाळूंज वृक्षाची' नोंद ब्रिटीश वनस्पती शास्त्रज्ञांनी देखील केलेली आहे. या पाणवठ्याच्या ठिकाणी आढळणाऱ्या 'वाळूंज' वृक्षाचे शास्त्रीय नाव हे 'सॅॅलिक्स टेट्रास्पर्मा…

ताम्हिणी गावाची 'विंझाई देवी'

Image
आठवडा संपत आला कि प्रत्येकजण कुठे ना कुठे जायचा प्लॅन ठरवत असतो. भटक्यांना तर सांगावे लागतच नाही कारण त्यांचा एखादा आडवाटेवर असलेला किल्ला किंवा एखादी अनवट लेणी भटकण्याचे ठरलेले असतेच. परंतु तुम्हाला स्वतःच्या कुटुंबासोबत निवांत क्षण घालवायचे असल्यास पुण्यापासून अगदीच जवळ असलेले ताम्हिणी गावातील 'विंझाई देवीचे’ सुंदर मंदिर नक्कीच पाहण्यासारखे आहे. 'ताम्हिणी' गावातील 'विंझाई देवीचे' सुंदर मंदिर हे पश्चिम घाटातील संवेदनशील अधिवास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आहे.
बऱ्याचदा पावसाळ्यात मनसोक्त भिजण्यासाठी पर्यटक या 'ताम्हिणी' घाटाच्या दिशेने गाड्या वळवतात परंतु या सुंदर आणि शांत असलेल्या 'विंझाई देवीच्या' मंदिरात फारसे लोक कधीही फिरकत नाहीत. अश्या या सुंदर मंदिरात जायचे असल्यास स्वतःची गाडी कधीहि असलेली उत्तम पुणे मार्गे चांदणी चौकातून ताम्हिणी गाव हे अगदी ४५ मिनिटाच्या अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसले आहे. पुण्यामधून मुळशी आणि आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी एस.टी बस या स्वारगेट स्थानकातून सुटतात हा देखील एक पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. त…