महाराष्ट्रातील 'बौद्ध लेण्यांची' कृष्णधवल छायाचित्रे


आपल्या महाराष्ट्राचे प्राचीन कलास्थापत्य म्हणजे 'महाराष्ट्रातील लेणी'. जवळपास १२०० लेण्यांपैकी दोन तृतीयांश लेणी या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रातील प्राचीन स्थापत्यापैकी  'लेणी' या आपल्याला डोंगरामध्ये कोरलेल्या असल्यामुळे आजही व्यवस्थित टिकून आहेत. 'लेणी' बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे हि वास्तूशैली दीर्घकाल टिकावी हे याच्या मागचे मुख्य प्रयोजन होते. धार्मिक वस्तीसाठी डोंगरांमध्ये लेण्या खोदायची पद्धत सर्वप्रथम मौर्यांनी चालू केली. 'चक्रवर्ती सम्राट अशोकाने' गया येथून जवळ असणाऱ्या 'बराबर' टेकड्यांवर लेणी बांधली आणि मग हळूहळू या लेण्यांची शैली विकसित होत गेलेली आपल्याला पहावयास मिळते. महाराष्ट्रामधील पहिली लेणी हि 'भाजे लेणी' ओळखली जाते. 

आपल्या महाराष्ट्रात बेडसे, कार्ले, अजिंठा, वेरूळ, नासिक, कोंडाणे, जुन्नर येथे बौद्ध लेण्या आहेत ह्या सर्व महत्वाच्या लेण्यांची कृष्णधवल छायाचित्रे हि सत्तर च्या दशकात 'Owen .C. Kail(ओवेन सी. केल)' यांनी काढली आणि आपल्या 'Buddhist Cave Temples of India' या पुस्तकात प्रकाशित केली आहेत. या कृष्णधवल छायाचित्रांंमध्ये आपल्याला कोंडाणे लेणी, जुन्नर येथील मानमोडी लेणी, कार्ले लेणी, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, कान्हेरी लेणी, महाकाली लेणी, महाड लेणी, खडसांबळे लेणी, भाजे लेणी तसेच पितळखोरा लेणी यांची सुंदर छायाचित्रे बघायला मिळतात. महाराष्ट्रातील 'बौद्ध लेण्यांची' कृष्णधवल छायाचित्रे पुढीलप्रमाणे:-

कर्जत जवळील 'कोंडाणे लेणी' येथील चैत्याचा दर्शनी भाग.

भाजे लेणी येथील चैत्याचा दर्शनी भाग.

भाजे लेणी येथील १८ क्रमांक लेणीमधील इंद्राचे शिल्प.

बेडसे लेणी येथील चैत्याचे प्रवेशद्वार.

बेडसे लेणी येथील वऱ्हांंडा

कार्ले लेणी येथील चैत्याचे प्रवेशद्वार.

कार्ले लेणी येथील हत्तींचे शिल्प.

कार्ले लेणी येथील युगुलांची शिल्पे.

कार्ले लेणी येथील चैत्यामध्ये असलेल्या स्तंभांची रचना आणि त्याच्यावरील शिल्पे.

कार्ले लेणी येथील चैत्यामध्ये असलेल्या स्तंभांवरील युगुल शिल्पे.

कार्ले लेणी येथील स्तूप.

 खडसांबळे लेणी क्रमांक १३ येथील स्तूप.

महाड जवळील गांधारपाले लेणी क्रमांक १५ मधील स्तूप.

महाड जवळील गांधारपाले लेणी क्रमांक २१ मधील शिल्प.

 जुन्नर मधल्या मानमोडी लेणी येथील चैत्याचा दर्शनी भाग.

 जुन्नर मधल्या अंबा अंबिका लेणी येथील चैत्याचा दर्शनी भाग.

जुन्नर जवळील लेण्याद्री येथील चैत्याचा दर्शनी भाग.

नासिक येथील त्रिरश्मी लेण्याच्या चैत्याचा दर्शनी भाग.

नासिक येथील त्रिरश्मी लेणी क्रमांक ३ याचा दर्शनी भाग. 

नासिक येथील त्रिरश्मी लेणी क्रमांक १० याचा दर्शनी भाग.

मुंबई येथील महाकाली लेणीमधील महायान शिल्पे.

बोरीवली जवळील कान्हेरी लेणी क्रमांक १ येथील चैत्याचा दर्शनी भाग.

बोरीवली जवळील कान्हेरी लेणी मधील स्तूप.

बोरीवली जवळील कान्हेरी लेणी क्रमांक ३ येथील चैत्याचा दर्शनी भाग.

बोरीवली जवळील कान्हेरी लेणी क्रमांक ६७ येथील महायान शिल्पे.

बोरीवली जवळील कान्हेरी लेणी क्रमांक ६६ येथील वज्रयान शिल्पे.

बोरीवली जवळील कान्हेरी लेणी क्रमांक ३ येथे ओवरीच्या डाव्या बाजूला वरद मुद्रारुपात २५ फुट उंच असलेली 'भगवान गौतम बुद्ध' यांची मूर्ती आणि उजव्या कोपऱ्यामध्ये 'दिपतारा'

बोरीवलीजवळील कान्हेरी लेणी येथील बौद्ध भिक्षु यांची 'निर्वाणविठी'. 

 औरंगाबाद लेणी क्रमांक ४  येथील स्तूप आणि आतली रचना.

औरंगाबाद लेणी क्रमांक ७ येथील वज्रयान शिल्पे.

पितळखोरा लेणी दर्शनी भाग.

पितळखोरा लेणी क्रमांक १२ येथील चैत्याचा दर्शनी भाग.

पितळखोरा लेणी क्रमांक १३ येथील चैत्याचा दर्शनी भाग.

पितळखोरा लेणी क्रमांक ४ येथील विहाराचा दर्शनी भाग यामध्ये आपल्याला द्वारपाल पाहायला मिळतात.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी  क्रमांक १ येथील लेण्याचा दर्शनी भाग.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी  क्रमांक १ यामध्ये असलेले 'भगवान गौतम बुद्ध' यांचे शिल्प.

 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी  क्रमांक ७  याचा दर्शनी भाग.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी  क्रमांक ९ येथील चैत्याचा दर्शनी भाग.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी  क्रमांक १९ येथील चैत्याचा दर्शनी भाग.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी  क्रमांक १९ येथील स्तूप.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी  क्रमांक २३ याचा दर्शनी भाग.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी  क्रमांक २६ येथील स्तूप छायाचित्र.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी  क्रमांक २६ येथील चैत्याचा दर्शनी भाग.

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील 'विश्वकर्मा लेणे' येथील चैत्याचा दर्शनी भाग.

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील 'विश्वकर्मा लेणे' येथील खिडकीचा दर्शनी भाग.

 जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील 'विश्वकर्मा लेणे' येथील स्तूप.

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील लेणी क्रमांक १२ हि लेणी 'तीन ताल' म्हणून ओळखली जाते. 

जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील वज्रयान शिल्पे.

(टीप:- छायाचित्रे हि Buddhist Cave Temples of India या पुस्तकातील आहेत. तसेच सगळी छायाचित्रे हि Owen C Kail. यांनी काढलेली आहेत.)
______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Buddhist Cave Temples of India:- Owen C Kail, D.B. Taraporevala Sons &  CO Private Ltd., 1975.

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________
  
   
         

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage