'सदाशिवरावभाऊ पेशवे' यांच्या स्मरणार्थ बांधलेला तलाव


महाराष्ट्रात आजही अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे आजही इतिहासाच्या पाउलखुणा आजही लपलेल्या आहेत. अश्याच काही पाउलखुणा या कर्जत पासून जवळच असलेल्या 'भिवपुरी' गावात आपल्याला पहायला मिळतात. भिवपुरी गाव मुळातच निसर्गरम्य असल्यामुळे या 'भिवपुरी' गावामध्ये काही घाटवाटा या देशावरून खाली उतरतात. अश्या या महत्वाच्या 'भिवपुरी' गावामध्ये एक सुंदर 'पेशवेकालीन तलाव' आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.

'भिवपुरी' येथे यायचे झाले तर आपल्याला पुण्याहून कर्जतमार्गे येता येते तसेच मुंबईवरून कर्जत गाठून आपल्याला 'भिवपुरी' येथे आपल्याला येता येते. कर्जत गावामधून 'भिवपुरी' गावामध्ये येण्यासाठी आपल्याला रिक्षा देखील सहज उपलब्ध होतात. 'भिवपुरी' हे गाव मुळातच निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. याच्या एका बाजूला उंचच उंच सह्याद्रीचे कडे आपले लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सगळ्या बाजूने धबधबे अक्षरशः कोसळत असतात. अश्या सुंदर ठिकाणी बांधला गेलेला 'पेशवेकालीन तलाव' यामध्ये अजून भर घालतो.


'सदाशिवरावभाऊ पेशवे' यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या तलावाचे प्रवेशद्वार.

राजमाचीपासून उत्तरेस जवळपास १४ कि.मी. अंतरावर 'कुसूर' गावापासून भिवपुरी गावापर्यंत जाण्यासाठी साधारणपणे ४ कि.मी. लांबीचा 'कुसूर' घाट आहे. हे 'कुसूर' गाव समुद्रसपाटीपासून जवळपास २१४५ फुट उंच असून 'आंध्रा नदी' दरीच्या मुखावर हे गाव वसलेले आहे. या कुसूर घाटामधून वाट खाली उतरून कोकणात 'भिवपुरी' या गावात येते. पूर्वी पुणे, तळेगाव याठीकाणावरून कर्जत, नेरळ, कल्याण या गावांकडे जाण्यासाठी 'कुसूर' घाटामधून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असे. या ऐतिहासिक 'कुसूर' घाटामधून पूर्वी घोडेस्वार आणि ओझे लादून गुरे नेली जात असत. परंतु 'कुसूर' घाटामधून बैलगाडी जाण्यायोग्य रस्ता कधीही नव्हता. 'कुसूर' घाटामधून जाणारा रस्ता हा पेशवेकाळातील आहे.    

याच घाटवाटेवरील पांथस्थांची तहान भागावी म्हणून 'सदाशिवरावभाऊ पेशवे' यांच्या पत्नी 'पार्वतीबाई पेशवे' यांनी हा सुंदर अष्टकोनी तलाव 'सदाशिवरावभाऊ पेशवे' यांच्या स्मरणार्थ बांधला. जेव्हा पानिपत येथे 'सदाशिवरावभाऊ पेशवे' धारातीर्थी पडले त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी 'पार्वतीबाई पेशवे' या पुण्यामध्ये आल्या त्याच्यानंतर त्या काहीकाळ वास्तव्यासाठी 'भिवपुरी' येथे आल्या तेव्हा त्यांनी हा सुंदर अष्टकोनी 'सदाशिवरावभाऊ पेशवे' यांच्या स्मरणार्थ हा सुंदर तलाव बांधला. याबाबत पुणे गॅॅझेटियर १८८५ मध्ये पान क्रमांक १५२ यामध्ये जो उल्लेख येतो तो पुढीलप्रमाणे:-


'पार्वतीबाई पेशवे' यांनी 'सदाशिवभाऊ पेशवे' यांच्या स्मरणार्थ बांधलेला तलाव.

At Bhivpuri there is a fine stone reservoir built at a cost Rs. 75000 by Parvatibai widow of Sadashiv Chimnaji of the Peshwa's family. The road is passable for mounted horsemen or laden bullocks, but not for carts. It is a great line of traffic from Talegaon to Karjat, Neral, Kalyan and Panvel. The yearly toll revenue of about Rs. 200 is spent on repairing the pass.        

अशी ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला या 'पार्वतीबाई पेशवे' यांनी पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या 'सदाशिवभाऊ पेशवे' यांच्या स्मर्णार्थ  बांधलेल्या तलावाबद्दल माहिती मिळते तसेच या तलावाला बांधण्यास ७५००० रुपये लागले याची देखील नोंद आपल्याला मिळते. 'पार्वतीबाई पेशवे' यांनी बांधलेल्या या सुंदर तलावाला पायऱ्यांचा घाट बांधलेला आहे आणि या तलावाच्या आतमध्ये उतरण्यासाठी काही ठिकाणी छोट्या पायऱ्या बांधण्यात आलेल्या आपल्याला पहायला मिळतात. तसेच काही ठिकाणी तलावातील पाणी काढण्यासाठी रहाटाचीसुद्धा सोय केली होती हे आपल्याला तेथील कधी दगडांच्या खुणांवरून समजते.


'भिवपुरी' गावाचा  महत्वाचा वारसा आहे.

'पार्वतीबाई पेशवे' यांनी बांधलेला हा तलाव आजही प्रचंड पाण्याचा साठा आपल्या पोटात साठवून वर्षाचे बारा महिने हा 'भिवपुरी' गावाची तहान आजही भागवत आहे. आजही 'भिवपुरी' येथील पेशवेकाळातील अष्टकोनी तलाव बघताना आजही 'सदाशिवरावभाऊ  पेशवे' आणि पानिपतची लढाई आठवते. असा हा सुंदर 'भिवपुरी' गावाचा  महत्वाचा वारसा आहे. या सुंदर पेशवेकालीन अष्टकोनी तलावाला भेट देऊन 'पार्वतीबाई पेशवे' यांनी केलेल्या  या महत्वाच्या कामाची प्रत्येकाने या तलावाला भेट देताना आठवण ठेवावी. अश्या या 'भिवपुरी' गावाच्या वारसास्थानाला भेट देऊन 'सदाशिवरावभाऊ पेशवे' यांचे स्मरण नक्की करावे. 


______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) Gazeteer of Bombay Presidencey Poona:- Page No 152, Government Central Press, 1885.

कसे जाल:-
पुणे - लोणावळा - कर्जत - भिवपुरी.
          
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा


No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage