इंग्रजांची सत्ता भारतात स्थिरावत होती यादरम्यान आपल्याकडे झालेला सत्ता बदल स्वीकारत असताना अनेक गमती जमती घडलेल्या बघायला मिळतात. अशीच एक गोष्ट आहे 'मांजराच्या रॉयल सॅल्युटची'. मांजराला मिळणारा 'रॉयल सॅल्युट' हे ऐकून नक्कीच गंम्मत वाटेल. पुण्यामध्ये 'दापोडी' येथे 'दापोडी वर्कशॉप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी' आहे. या सोसायटी मध्ये इंग्रज अधिकाऱ्यांचे बंगले होते तसेच आजही काही बंगले अस्तित्वात आहेत. याच ठिकाणी 'मुंबई' येथील गव्हर्नर 'सर रॉबर्ट ग्रँट' देखील काही काळ वास्तव्यास होता. हा 'सर रॉबर्ट ग्रँट' म्हणजे ज्याच्या नावाने आज 'मुंबई' मधील 'ग्रँट मेडिकल कॉलेज' ओळखले जाते. तसेच मुंबईमधील प्रसिद्ध 'ग्रँट रोड' स्टेशन आणि रस्ता देखील याच्याच नावाने ओळखला जातो. या 'सर रॉबर्ट ग्रँट' आणि 'दापोडी' यांचा खूप जवळचा संबंध आहे.
'मुंबई' मधून पुण्यामध्ये आल्यावर 'सर रॉबर्ट ग्रँट' हा 'दापोडी' येथे राहत होता. तेव्हा दिनांक ९ जुलै १८३८ रोजी 'सर रॉबर्ट ग्रँट' याचे 'दापोडी' येथील निवासस्थानामध्ये निधन झाले. या 'सर रॉबर्ट ग्रँट' याचे संध्याकाळी ज्या खोली मध्ये निधन झाले तेव्हा त्या क्षणीच एक 'मांजर' हे 'सर रॉबर्ट ग्रँट' याच्या खोलीमधून बाहेर आले. तेव्हा 'सर रॉबर्ट ग्रँट' याच्या खोलीच्या दरवाजाच्या बाहेर उभ्या असलेल्या 'सर रॉबर्ट ग्रँट' याच्या नोकराला वाटले की आपल्या 'ग्रँट' साहेबांचा आत्मा हा या मांजरामध्ये शिरला असावा म्हणून 'सर रॉबर्ट ग्रँट' याच्या नोकराने त्या खोलीतून आलेल्या मांजराला 'रॉयल सॅल्युट' ठोकला.

'सर रॉबर्ट ग्रँट' हा 'दापोडी' येथे राहत होता. छायाचित्र आंतरजालावरून घेतलेले आहे.
त्यानंतर रोज संध्याकाळी 'सर रॉबर्ट ग्रँट' याच्या खोलीमधून हे 'मांजर' ज्या ठराविक वेळेमध्ये बाहेर पडत असे तेव्हा तो नोकर त्या मांजराला 'रॉयल सॅल्युट' ठोकत असे. ते 'मांजर' रोज 'सर रॉबर्ट ग्रँट' याच्या खोलीमधून बाहेर येत असे यामुळे त्या नोकराची खात्री पटली होती की हे 'मांजर' म्हणजे आपला मालक 'सर रॉबर्ट ग्रँट' हाच आहे. म्हणून जेव्हा 'सर रॉबर्ट ग्रँट' याच्या खोलीमधून ते 'मांजर' बाहेर पडले तेव्हा या नोकराने त्याला रोजच्या प्रमाणे त्याला 'रॉयल सॅल्युट' ठोकला. तेव्हा आजूबाजूला असलेल्या इतर नोकरांनी देखील हा प्रकार पाहिला आणि सगळ्या इंग्रजांच्या छावणीमध्ये ही 'मांजर' आणि त्याला मिळणाऱ्या 'रॉयल सॅल्युटची' बातमी वाऱ्यासारखी पसरली.
तसेच ह्या 'सर रॉबर्ट ग्रँट' याचा आत्मा ज्या मांजराच्या मध्ये होता असे त्याकाळामध्ये समजले गेले होते त्याला जो 'रॉयल सॅल्युट' त्याचा नोकर देत असे त्याबद्दलची बातमी एकदाची मोठ्या अधिकाऱ्यांच्या कानावर जाऊन पोहोचली. त्या मोठ्या अधिकाऱ्याचा पहिले या मांजराला मिळणाऱ्या 'रॉयल सॅल्युटच्या' गोष्टीवर आजिबात विश्वास बसला नाही. परंतु ते सगळ्या इंग्रजांच्या मध्ये प्रसिद्ध झालेले 'मांजर' हे रोज एका ठराविक वेळेमध्ये 'सर रॉबर्ट ग्रँट' याच्या खोलीमधून बाहेर पडत असे हे त्या मोठ्या इंग्रज अधिकाऱ्याने देखील पाहिले आणि त्याने ती मांजराची गोष्ट ही त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला देखील सांगितली.

'सेंट मेरीज चर्च' येथे 'सर रॉबर्ट ग्रँट' याला पुरले गेले.
असे करत करत ही बातमी इंग्रज 'गव्हर्नर' याच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली. हे सर्व ऐकून शेवटी इंग्रज 'गव्हर्नर' याने एक या मांजराच्या नावाने 'जी. आर' काढला की "जोपर्यंत हे मांजर 'सर रॉबर्ट ग्रँट' याच्या खोलीमधून बाहेर पडत राहील, तोपर्यंत त्याला रोज 'रॉयल सॅल्युट' दिला जाईल" या 'जी. आर' चे तंतोतंत पालन सगळ्या लोकांनी केले. रोज हे 'मांजर' 'सर रॉबर्ट ग्रँट' याच्या खोलीतून बाहेर पडत असे आणि 'रॉयल सॅल्युट' घेऊन बाहेर फिरायला जात असे. काही दिवसांनी हे 'मांजर' दिसेनासे झाले. तेव्हा हा मांजराला इंग्रजांच्या कडून मिळणारा 'रॉयल सॅल्युट' थांबला. तसेच दापोडीपासून जवळ असलेल्या 'सेंट मेरीज चर्च' येथे 'सर रॉबर्ट ग्रँट' याला पुरले गेले. तसेच या मांजराच्या 'रॉयल सॅल्युटच्या' चर्चेला जे उधाण आले होते ते अखेरीस थांबले आणि इतिहासाच्या पानांमध्ये हे ऐतिहासिक 'मांजर' आणि 'रॉयल सॅल्युट' कायमचे लपले गेले.
______________________________________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१) पुणे अँड ईट्स राउंड अबाऊट- १८५६.
______________________________________________________________________________________________
______________________________________________________________________________________________
महत्वाचे:-
१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.
२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या पाऊलखुणा ठेवाव्यात.
४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________
No comments:
Post a Comment
Thank You For Comment...!!! :)