माहीम येथील 'काम्य स्तूप'


महाराष्ट्रामध्ये विविध कालखंडामध्ये लेण्या खोदलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आपल्या महाराष्ट्रातील या प्राचीन लेण्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सर्वात प्राचीन स्मारके ही पाषाणात खोदलेल्या या रेखीव बौद्ध लेण्या आहेत. अश्याच काही लेण्यांचे अवशेष आपल्याला कधीकधी त्या लेण्यांच्या परीसरामध्ये सापडतात. असाच एक 'काम्य स्तूप' हा मुंबई येथील माहीम भागात प्रसिद्ध शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या लेफ्टनंट दिलीप गुप्ते रोडवर आपल्याला बघावयास मिळतो.


मुंबई येथील माहीम भागात प्रसिद्ध शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या लेफ्टनंट दिलीप गुप्ते रोडवर ओम सिद्धीविनायक अपार्टमेंट आपल्याला बघायला मिळते तिथेच पार्किंगमध्ये आपल्याला हा 'काम्य स्तूप' एका ग्रॅॅनाईटच्या ओट्यावर जतन करून ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो. हे 'काम्य स्तूप' आपल्याला बऱ्याचवेळेस लेण्यांच्या परिसरात आढळून येतात किंवा एखाद्या उंच टेकडीच्या शिखरावर देखील आढळून येतात. 


वज्रयान संप्रदायाचे वैशिष्ट्य असणारा माहीम येथील 'काम्य स्तूप'. 


'काम्य' स्तूप हे मुख्यत: वज्रयान बौद्ध संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे असे प्रसिद्ध पुरातत्व अभ्यासक श्री. म. न. देशपांडे यांचे मत आहे. अश्या काम्य स्तूपांच्या प्रतिमा या रत्नागिरी तसेच सांची येथे खूप मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या आहेत. असे काही स्तूप आपल्याला पन्हाळेकाजी लेणीच्या परिसरात देखील पहायला मिळतात. माहीम येथील स्तूप आपण नीट बघितला तर आपल्याला हा 'काम्य स्तूप' साधारणपणे चार फुट उंच असून या काम्य स्तुपावर एक कमानाच्या आकाराच्या तोरणाखाली एक आपल्याला 'गौतम बुद्धांंची' प्रतिमा बघायला मिळते. 


अश्याच प्रकारचा एक 'काम्य स्तूप' हा आपल्याला कान्हेरी लेणीच्या रस्ता क्रमांक १ वर मोडतोड झालेल्या अवस्थेत आपल्याला पहायला मिळतो. तसेच पन्हाळे काजी लेणीच्या आवरात देखील आपल्याला अश्या पद्धतीचा 'काम्य स्तूप' मोठ्या स्वरुपात पहावयास मिळतो. असा हा माहीम येथून शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या लेफ्टनंट दिलीप गुप्ते रोडवर असलेला 'काम्य स्तूप' हा आपल्या महाराष्ट्राचा महत्वाचा वारसा आहे. जेव्हा कधी लेफ्टनंट दिलीप गुप्ते रोडवर फिरण्यासाठी जाल तेव्हा या वज्रयान संप्रदायाचे वैशिष्ट्य असणाऱ्या 'काम्य स्तुपाला' नक्की भेट द्या. 

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) महाराष्ट्र राज्य गॅॅझेटीयर- महाराष्ट्र इतिहास - प्राचीन काळ (स्थापत्य व कला ) खंड १ भाग २:- संपादक डॉ. अ. शं. पाठक, लेखक डॉ. अ. प्र. जामखेडकर, दर्शनिका विभाग सांस्कृतिक कार्य विभाग, २००२.   

कसे जाल:-
पुणे - लोणावळा - पनवेल - माहीम.   
          
______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________

लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा            


   

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage