हरिहरेश्वरचे 'दगडी अनारसे'

 

आपल्या महाराष्ट्रामध्ये जश्या इतिहासाच्या पाऊलखुणा लपलेल्या आहेत तश्याच मोठ्या प्रमाणात भौगोलिक पाऊलखुणा देखील लपलेल्या आहेत. या भौगोलिक पाऊलखुणांचा मागोवा घेणे देखील नक्कीच महत्वाचे ठरते यामधून आपल्याला विविध भौगोलिक चमत्कार देखील समजायला आणि अभ्यासाला मदत होते. अश्याच काही भौगोलिक पाऊलखुणांच्यापैकी एक भौगोलिक आश्चर्य आपल्याला पहावयास मिळते ते कोकणातील हरिहरेश्वर येथे. 


भौगोलिक आश्चर्य 'दगडी अनारसे'.  

समुद्र किनारा हा सगळ्याच लोकांना आवडतो. याच अश्या समुद्रकिनारी एक निसर्गरम्य ठिकाण वसलेले आहे ते हरिहरेश्वर. हे हरिहरेश्वर महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणांच्यापैकी एक महत्वाचे ठिकाण. मुंबई-पुण्याचे लोक मोठ्या प्रमाणात हरिहरेश्वर येथे येतात. तसेच या हरिहरेश्वराचे स्थानमहात्म्य देखील अत्यंत मोठे. याच हरीहरेश्वर येथे असलेले शिवमंदिर आणि कालभैरव मंदिर सर्व लोकांच्या श्रद्धेचा विषय. त्यामुळे येथे खूप मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित असतात. शिवाचे आणि कालभैरवाचे दर्शन घेऊन येथे परिक्रमा देखील केली जाते. ही परिक्रमा समुद्राच्या भरती आणि ओहोटी पाहून केली जाते. 


याच परिक्रमेच्या मार्गावर हरीहरेश्वर येथे एक भौगोलिक आश्चर्य लपलेले आपल्याला दिसते. तसेच जे जिओलॉजी किंवा भूगोलाचे विद्यार्थी असतात त्यांना हे ठिकाण माहिती पण असते आणी आवडीचे देखील असते. हरिहरेश्वर येथे जे भौगोलिक आश्चर्य लपलेले आहे ते म्हणजे दगडी अनारसे. आता हे दगडी अनारसे तयार कसे होतात हे नक्की समजून घेणे आपल्याला गरजेचे आहे. 


याच परिक्रमेच्या मार्गावरून खाली उतरूनआल्यावर हरीहरेश्वर येथे भौगोलिक आश्चर्य लपलेले आहे.

तसे पहावयास गेले तर हरीहरेश्वर हे ठिकाण एका टेकडीवर उंच वसलेले आहे. त्यामुळे या टेकडीच्या पोटामध्ये  समुद्राच्या लाटा या अनेकवेळेस येऊन खडकावर आदळतात. त्यामुळे गेली कित्यायेक लाख वर्षे या लाटा आदळून आदळून हरिहरेश्वर येथील टेकडीच्या खडकामध्ये लहान मोठी भोकं, गुहा, तसेच नक्षी निर्माण झालेली आपल्याला पहावयास मिळते. तसेच या लाटांच्या आदळण्यामुळे येथे आपल्याला दगडांवर नक्षी देखील झालेली पहावयास मिळते. परंतु यामध्ये आपले लक्ष वेधून घेते ते भोकाभोकांची जाळी असलेले नैसर्गिक नक्षीकाम. याच नैसर्गिक नक्षीकामाला 'दगडी अनारसा' असे देखील संबोधले जाते. 


नैसर्गिक नक्षीदार जाळी असलेले दगडी अनारसे पहावयाचे असतील तर हरिहरेश्वर येथे नक्की भेट द्या.

अशी ही नैसर्गिक नक्षीदार जाळी असलेले दगडी अनारसे पहावयाचे असतील तर हरिहरेश्वर येथे जेव्हा आपण प्रदक्षिणा मार्ग उतरतो आणि खाली जातो तेव्हा आपल्याला हे नैसर्गिक दगडी अनारसे खुणावतात. या जाळीदार नैसर्गिक नक्षीकडे फारसे कोणी पाहत नाही त्यामुळे हे नैसर्गिक भूरूप आजही दुर्लक्षित आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा हरिहरेश्वर येथे दर्शनासाठी जाल तेव्हा हे नैसर्गिक आश्चर्य असलेल्या दगडी अनारश्याला नक्की भेट द्या.

______________________________________________________________________________________________

कसे जाल:-
पुणे - चांदणी चौक - पौड - ताम्हिणी - ताम्हिणी घाट - माणगाव - श्रीवर्धन - हरिहरेश्वर. 

संदर्भग्रंथ:-
१) विज्ञानाची नवलतीर्थे:- प्र. के. घाणेकर, शिल्पा प्रकाशन, २०११. 

______________________________________________________________________________________________


महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_______________________________________________________________________________________


लिखाण आणि छायाचित्रे © २०२२ महाराष्ट्राची शोधयात्रा               

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage