Posts

Showing posts from November, 2018

ताम्रपटातून येणारे 'पुण्याचे प्राचीन उल्लेख'

Image
पुणे शहर हे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. सर्वोत्तम शिक्षणसंस्था, सुंदर हवामान, आणि पुण्याला होणारा पाणीपुरवठा हे संपूर्ण पुण्याचे वैभव आहे. पुणे शहर आज जरी 'मेट्रो सिटी' म्हणून भारतभर प्रसिद्ध होत असले तरी या शहराचा इतिहास फार मोठा आहे. तसेच या इतिहासाबद्दल माहिती करून घेण्यासाठी आपल्याला पुणे आणि परिसराची भौगोलिक माहिती तर नक्की हवी. 
बऱ्याचदा लोकांचा हा प्रश्न असतो कि पुणे नाव कसे पडले किंवा त्या नावामागे काही इतिहास आहे का? परंतु या सर्व माहितीसाठी पुण्याची भौगोलिक रचना आणि इतिहास यांचा मागोवा घेणे आपल्याला महत्वाचे आहे.सह्याद्रीच्या पूर्वेला पुणे हे शहर समुद्रसपाटीपासून १८३७ फुट उंचीवर वसलेले असून याच्या बाजूला पिंपरी-चिंचवड हि गावे आहेत. इंद्रायणी आणि पवना या नद्या पुण्याच्या वायव्य दिशेकडून वाहतात. पुणे शहरातील सर्वात उंच टेकडी हि वेताळ टेकडी असून हि शहराच्या मधोमध आहे या टेकडीची उंची २६२४ फुट आहे. पुण्यापासून अगदी जवळ असलेला 'सिंहगड' हा पुण्यातील टेकड्यांमध्ये सर्वात उंच आहे त्याची उंची ४३२९ फु…