Posts

गद्धेगाळावरील शापवचने

Image
लेखामध्ये शापवचने घालण्याची पद्धत ही साधारणपणे ५ व्या शतकापसून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही शापवचने जो कोणी ताम्रपट किंवा शिलालेखामध्ये लिहून किंवा कोरून दिलेले दान मोडेल किंवा त्याला बाधा आणेल अश्या व्यक्तीला ते उद्देशून असते आणि त्याची रचना साधारणपणे सारखी असते. या शापवचनामध्ये फरक पडला तर वाचनाच्या संख्येत किंवा शब्दांमध्ये बदल होतो बऱ्याचदा सर्व लेखातून

स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां। षष्टी वर्षसहस्त्राणी विष्टायां जायते कृमी:।।

या श्लोकाची रचना शापवचनाच्या कामी केली जाते. बऱ्याचदा मराठी लेखामधून हेच शापवचन आपल्याला आढळून येते याची उदाहरणे म्हणजे आंबेजोगाई आणि वेळापूर येथील लेख. शिलाहारांच्या आणि यादवांच्या लेखातून शापवचने मराठी भाषेत घालण्याची प्रथा रूढ झालेली आपल्याला पहायला मिळते आणि यातून 'गद्धेगाळ' म्हणजेच (ass-curse) या नावाने प्रसिद्ध असणारे वचन पुढे रूढ झालेले आपल्याला दिसते.

अक्षी गावातील 'गद्धेगाळ'.
गद्धेगाळवर काही श्लोक आढळतात त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे:-
१) तेहाची माय गाढवे झविजे (हा परळ येथे असलेल्या गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे) २) तेयाचीऐ …

पुण्यामधील नारायण पेठेमध्ये असलेले अपरिचित 'शेषशायी विष्णू मंदिर'

Image
पुणे हे जसे विद्येचे माहेरघर समजले जाते तसेच पुणे हे विविध मंदिरांसाठी देखील प्रसिद्ध आहे म्हणूनच पुणे शहराची ओळख हि 'मंदिरांचे शहर' म्हणून देखील सगळीकडे आहे. अश्याच या पुणे शहरातील मंदिरांची नावे देखील आपल्याला गमतीशीर आढळून येतात परंतु या मंदिराच्या शहरामध्ये नारायणपेठेमध्ये एक छानसे आणि वैशिष्ट्यपूर्ण 'शेषशायी विष्णूचे' फारसे परिचित नसलेले सुंदर मंदिर पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये आपल्याला पहायला मिळते. 
पुण्यामधील हे अपरिचित 'शेषशायी विष्णूचे' मंदिर पाहायचे असल्यास आपण 'अप्पा बळवंत' चौकातून केळकर रस्त्यावर लागावे तेथून रमणबाग चौकाकडे जाताना आपल्या डाव्या बाजुस एच.डी.एफ.सी. बँकेची नारायण पेठ ब्रांच लागते तेथेच अलीकडे डाव्या बाजूस आपल्याला या 'श्री शेषशायी मंदिर' अशी पाटी वरच्या बाजूस आपल्याला पाहायला मिळते. अजून एक मंदिराच्या जवळची खून म्हणजे श्रीकृष्ण ब्रॉस बँँड हे दुकान याच्या शेजारून  आपल्याला या मंदिराकडे आतमध्ये जाता येते.

'श्री शेषशायी विष्णू मंदिर'
नारायण पेठेतील एका जुन्या  वाड्याच्या आतमध्ये असलेले हे मंदिर खरोखरच एकवेळ शंका आणते…

लोणावळा - खंडाळ्याच्या कुशीतील दुर्गरत्न ‘मृगगड उर्फ भेलीवचा किल्ला’

Image
लोणावळा-खंडाळा ही सर्वपरिचित ठिकाणे परंतु या या लोणावळा खंडाळ्याच्या कुशीमध्ये असेच एक अपरिचित दुर्गरत्न 'किल्ले मृगगड' उर्फ 'भेलीवचा किल्ला' लपलेला आहे. बऱ्याचदा लोणावळा-खंडाळा परिसरातील किल्ले भटकायचे झाले कि भटक्यांची पावले वळतात ती लोहगड, विसापूर, राजमाची ह्या प्रसिद्ध किल्यांच्या वाटेवर. परंतु तुम्हाला जर निसर्गाचे नवे रूप, निरव शांतता, सह्याद्रीचे उंचच उंच आणि बेलाग कडे, घाट आणि कोकण यांच्यामधली नैसर्गिक विविधता अनुभवयाची असेल तर थोडीशी आडवाट करून तुम्ही 'मृगगड किल्याचा'ट्रेक तुमचा पर्याय बनवू शकता आठवड्याचा सगळा थकवा पळवून 'मृगगडाचा ट्रेक' तुम्हाला नक्कीच सुखावू शकतो.

लोणावळ्याच्या लायन्स पॉईंटवर उभे राहिले असता खाली जो कोकणाचा प्रदेश दिसतो त्याला 'टायगर्स व्हॅली' असे नाव आहे. या 'टायगर्स व्हॅलीमध्ये' उभा असलेला छोटेखानी ‘मृगगड’ भटक्यांना आजही खुणावत असतो. लोणावळ्याच्या लायन्स पॉईंटवरून हे दुर्गरत्न ओळखायची खूण म्हणजे कोकणातून घाटावर आलेला 'मोराडीचा सुळका' होय या मोराडीच्या सुळक्याला 'स्वयंभू शिवलिंग' असे देखील म्हण…

मुंगळ्याच्या भविष्याच्या जोरावर जिंकलेला 'अहिवंतगड'

Image
प्राचीन कालखंडापासून महाराष्ट्रामधील ‘नाशिक’ शहराला खूप महत्व आहे ‘नाशिक’ आणि संपूर्ण परिसर हा प्राचीन काळापासून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध आहे. याच उक्तीप्रमाणे ‘नाशिक’ परिसरात विविध कालखंडात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपल्या राज्याचे संरक्षण व्हावे यासाठी तेथील भौगोलिक परिस्थिती अनुसरून विविध किल्ले उभारले. याच ‘नाशिक’ जिल्ह्यातील ‘सातमाळा डोंगररांगेत’ विस्तीर्ण पठार आणि ऐतिहासिक महत्व असलेला ‘अहिवंतगड’ आजही उभा आहे.
नाशिक जिल्ह्यातील सातमाळा डोंगर रांगेतील ‘अहिवंतगड’ बघायचा असेल तर आपल्याला नाशिक वरून ‘सप्तशृंग गडावर’ जाणारी किंवा ‘नांदुरी’ या गावाची बस पकडणे कधीही सोयीचे ठरते या बसने आपल्याला नांदुरीच्या अलीकडील ‘दरेगाव’ या गावाच्या अगदी बाहेर उतरता येते. हे ‘दरेगाव’ म्हणजेच ‘अहिवंत’ गडाच्या पायथ्याचे गाव असून वणी – नांदुरी या मुख्य रहदारीच्या रस्त्यावरून अगदी १ किलोमीटर परिसरात ‘अहिवंतगडाच्या’ कुशीत वसलेले एक छोटेसे सुंदर टुमदार गाव आहे.

दरेगाव येथून दिसणारा 'अहिवंतगड'. 
ज्या दुर्गभटक्यांना ‘अचला किल्ला’ पाहून डोंगरयात्रा करत ‘अहिवंतगडावर’ यायचे असेल त्या…

नसरापूर येथील उपेक्षित वारसास्थळ 'स्वराज्य स्मारक स्तंभ'

Image
आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गावांमध्ये विविध वारसा लपलेला आहे. अशी हि महत्वाची वारसा  स्थळे येता-जाता वाटेवर असूनही ती सहजपणे दुर्लक्षित होतात असेच एक वारसा स्थळ हे 'पुणे - सातारा' रस्त्यावर 'राजगडकडे' जाणाऱ्या 'नसरापूर' बसस्थानकाच्या शेजारी असून हे वारसा स्थळ चारही बाजूने कुंपण असलेल्या एका जागेमध्ये आहे. या चारही बाजूने कुंपण असलेल्या जागेमध्ये एक 'स्मारक स्तंभ' आपल्याला पाहायला मिळतो तोच हा 'स्वराज्य स्मारक स्तंभ' होय.

बऱ्याचवेळेस अनेक लोक या 'चेलाडी किंवा नसरापूर' फाट्यावरून राजगडाकडे जातात परंतु हा स्तंभ कायम खुणावतो परंतु कोणी या स्मारक स्तंभाकडे फिरकत देखील नाही. तसेच हा स्मारक स्तंभ का उभारला कशासाठी उभारला याबाबत मात्र लोकांना माहिती नसल्यामुळे हे ठिकाण अजून दुर्लक्षित होते. आज आपण या 'स्वराज्य स्मारक स्तंभाबद्दल' माहिती पाहणार आहोत.

'श्रीमंत बाबासाहेब पंतसचिव' यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे स्मारक म्हणून हा दगडी स्तंभ उभारला.
हा 'स्वराज्य स्मारक स्तंभ' भोर संस्थानचे अधिपती 'श्रीमंत बाबासाहेब…