संपर्क

महाराष्ट्राची शोधयात्रा मुख्य उद्देश... !!!

आपला महाराष्ट्र देश हा किल्ले, मंदिरे, देवळे, लेण्या आणि भौगोलिक स्थानांनी नटलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जपणे हा या 'महाराष्ट्राची शोधयात्रा' याचा उद्देश. या महाराष्ट्रातील शोधयात्रेचा अजून एक उद्देश असा कि प्रत्यक्ष ठिकाण पाहिल्याशिवाय कोणतीही माहिती लिहायची नाही आणि जी माहिती प्रत्यक्ष गोष्टी पाहून मिळवली जाईल त्याबद्दल इत्यंभूत माहिती देणे आणि महाराष्ट्राचा हा वारसा कसा जपला जाईल हि काही महत्वाची उद्दिष्टे समोर ठेवून हा या महाराष्ट्राच्या शोधयात्रेचा केलेला खटाटोप.

या शोधयात्रेतून किल्यांची मुशाफिरी, महाराष्ट्राला घडवण्याची लेण्यांची महत्वाची भूमिका आणि सुंदर कला स्थापत्याची मंदिरे आणि भौगोलिक गोष्टीतून सापडणारा महाराष्ट्र अश्या विविध गोष्टींची माहिती ऐतिहासिक संदर्भासहित उपलब्ध करून देणे हेच एकमेव उद्दिष्ट असेल. चला तर मग आपल्या 'महाराष्ट्राच्या शोधयात्रेला'.

- अनुराग वैद्य
INSTAGRAM FEED

@maharashtraheritage