Posts

Showing posts from May, 2018

शिवपूर्वकालीन महाराष्ट्रातील 'सुलतानांची स्वभावचित्रे'

Image
इ.स. १३१८ साली अल्लादिन खिलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सुरु झाले ते दिल्लीच्या सुलतानांचे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अंदाधुंदी माजलेली आपल्याला दिसते. शिवाजी महाराजांच्या आधी किंवा शिवपूर्वकालखंडात महाराष्ट्रामध्ये बहामनी सुलतानांनी काहीकाळ महाराष्ट्रावर राज्य केले आणि नंतर याच बहामनी सत्तेची शकले बनून बिदर येथील बरीदशाही, गोवळकोंडा येथील कुतुबशाही, अहमदनगर येथील निजामशाही, विजापूर येथील आदिलशाही, वऱ्हाड येथील इमादशाही तसेच खानदेशातील फारुखी घराणे अशी शकले तयार झाली. 

मध्युगातील या महाराष्ट्रातील राजवटींची माहिती बघताना या प्रत्येक राज्याचे जे सुलतान आहेत त्यांची काही महत्वाची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात त्यामध्ये आपल्याला शौर्य, सहिष्णुता, क्रौर्य, मदांधता, स्त्रैणपणा हे सारे गुण दिसून येतात. आजपर्यंत आपण फक्त एवढेच ऐकत आलो की हे सगळे क्रूर होते यांनी जनतेवर खूप कर बसवून प्रजेला त्रास दिला पण काही सुलतानांची चरित्रे ही मध्ययुगात लिहिली गेली त्यातील काही महाराष्ट्रातील विशेष 'सुलातानांची स्वभावचित्रे' नक्कीच बघण्यासारख…