Posts

Showing posts from July, 2018

पुणे शहराच्या विस्मृतीमध्ये गेलेला 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट'

Image
मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर वसलेले 'पुणे शहर' म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी एवढेच नव्हे तर पुण्याला 'ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट' म्हणून देखील ओळखले जाते. हेच पुणे शहर आता स्वतःची कात टाकत आता 'मेट्रो शहर' बनत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्याचे भाग्य उजळले आणि पेशव्यांच्या कालखंडात पुण्याचे नाव जगाच्या पाठीवर जरी कोरले गेले असले तरी देखील 'पुणे' शहराला प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. 'राष्ट्रकुट' काळापासून पुणे शहराचे उल्लेख आपल्याला आढळतात. परंतु बऱ्याच लोकांना हे माहिती नसते कि पुण्यामध्ये एक किल्ला देखील होता. इ.स. १५ व्या शतकाच्या सुरुवातीला 'बहामनी' राजवटीच्या कालखंडात पुणे शहरामध्ये एक 'कोट' उभारला गेला त्यालाच 'किल्ले हिस्सार किंवा पांढरीचा कोट' असे म्हटले जाऊ लागले आणि पुणे शहराचे महत्व वाढले.
इ.स. १३१८ साली अल्लादिन खिलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सुरु झाले ते दिल्लीच्या सुलतानांचे. याच कालखंडात पुण्यावर 'सुलतानी' अंमल सुरु झालेला आपल्याला पहायला …

सुरक्षित 'गिर्यारोहण'

Image
काल परवाच सगळी कडे एक बातमी आणि त्याचे व्हीडीओ हे प्रसार माध्यमे, फेसबुक, व्हाॅॅट्सएप यांच्या माध्यमातून सगळीकडे फिरत होती कि 'चिंचोटी धबधब्या' मध्ये जवळपास जवळपास २७ पर्यटक मुख्य धबधब्याच्या ठिकाणी अडकले. या सर्वांना वाचवायला वसई-विरार पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, महसूल यंत्रणा, पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना या धबधब्यातून वाचवले गेले. मुळात 'चिंचोटी धबधबा' अत्यंत धोकादायक असूनही 'पर्यटक' येथे गर्दी करतात. हेच प्रकार मागच्यावर्षी देखील सध्या सगळीकडे ट्रेंडिंग मध्ये असलेल्या 'अंधारबन आणि देवकुंड' या बाबत झालेले आहेत तरी देखील देवकुंड धबधबा आणि अंधारबन येथे जाणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.  

अश्याच घटना पूर्वी देखील झालेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी 'चंदेरी' किल्ल्या जवळ एक ग्रुप हरवलेला हरवलेला होता. तसेच राजगडावर भटकंती करायला गेलेल्या दोन तरुणांच्या खोडसाळ पणामुळे त्यांना चावलेल्या मधमाश्या. त्याच वर्षी स्वतंत्र पणे 'सोलो' ट्रेक करणाऱ्या गिर्यारोहकाचा कोकणकडा उतरताना मृत्यू तसेच 'साल्हे…