Posts

Showing posts from April, 2020

दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडावरील शिलालेख'

Image
पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीनही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला एक पुराणपुरुष असलेला पर्वत म्हणजे 'हरिश्चंद्रगड'. भटक्यांची पंढरी असलेल्या या 'हरिश्चंद्रगडाला' विशेष महत्व लाभले आहे ते त्याच्या नैसर्गिक 'कोकणकड्यामुळे'. 'हरिश्चंद्रगड' येथे जाण्यायेण्याच्या वाटा गिर्यारोहकांना आता अगदी माहिती आहेत. खिरेश्वर, पाचनई या वाटांवरून सतत गिर्यारोहक येत असतात तसेच 'नळीची वाट' आता हि फारच प्रसिद्ध वाट झालेली आहे. यापैकी 'नळीच्या वाटेवरून' वरती येतो तेव्हा आपण 'कोकणकड्याजवळ' येतो. तसेच 'पाचनई'  आणि 'खिरेश्वर' मार्गे आपण 'हरिश्चंद्रगडावर' असणाऱ्या 'हरीश्चंद्रेश्वर' मंदिराच्या इथे आपण येऊन पोहोचतो. मुळात सगळे भटके 'हरिश्चंद्रगड' येथे येतात ते केवळ 'कोकणकडा' बघायला आणि 'इंद्रवज्र' बघायला. परंतु पौराणिक आख्यायिकेंसोबत 'हरिश्चंद्रगड' येथे असलेल्या 'लेण्या' आणि 'मंदिरे' देखील फार महत्वाच्या गोष्टी आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे दुर्गभटक्यांची पंढरी असलेल्या 'हरिश्चंद्र…

मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील इंग्रजांनी बांधलेला बोरघाटातील 'अमृतांजन पूल'

Image
पुणे-मुंबई या महामार्गावरून सगळेच लोक आज मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. पुणे-मुंबई या महामार्गावरील बोर घाटामधील रस्ता हा फारच धोकादायक आणि वळणावळणाचा होता. द्रुतगती मार्गामुळे ह्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे महत्व थोडे कमी जरी झाले तरी देखील आजही लोक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. 'बोर घाटातील' या जुन्या मार्गावर एक ब्रिटीश कालीन पूल नेहमी लोकांना खुणावत असतो तसेच एक्सप्रेस वे ने जाताना आपली गाडी या ब्रिटीश काळात बांधल्या गेलेल्या पुलाच्या मधून जाते. आपल्यापैकी अनेक जणांनी हा इंग्रजांच्या काळातील हा पूल बघितला असेल. या पुलाला ओळखतात 'अमृतांजन पूल' या नावाने 
इ.स. १८१८ मध्ये जेव्हा शनिवारवाडा येथे 'युनियन जॅॅक' फडकला आणि महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांची राजवट सुरु झाली. या इंग्रजांच्या राजवटीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजांना त्यांचे राज्य स्थिर करण्यात गेला. त्यातच पुणे आणि मुंबई येथे जाणे येणे मोठे कष्टाचे काम होते. इंग्रजांच्या काळात या जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला 'पुणे-पनवेल महामार्ग असे संबोधले जात असे. याचे मुख्य कार…