Posts

Showing posts from May, 2020

'सदाशिवरावभाऊ पेशवे' यांच्या स्मरणार्थ बांधलेला तलाव

Image
महाराष्ट्रात आजही अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे आजही इतिहासाच्या पाउलखुणा आजही लपलेल्या आहेत. अश्याच काही पाउलखुणा या कर्जत पासून जवळच असलेल्या 'भिवपुरी' गावात आपल्याला पहायला मिळतात. भिवपुरी गाव मुळातच निसर्गरम्य असल्यामुळे या 'भिवपुरी' गावामध्ये काही घाटवाटा या देशावरून खाली उतरतात. अश्या या महत्वाच्या 'भिवपुरी' गावामध्ये एक सुंदर 'पेशवेकालीन तलाव' आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.
'भिवपुरी' येथे यायचे झाले तर आपल्याला पुण्याहून कर्जतमार्गे येता येते तसेच मुंबईवरून कर्जत गाठून आपल्याला 'भिवपुरी' येथे आपल्याला येता येते. कर्जत गावामधून 'भिवपुरी' गावामध्ये येण्यासाठी आपल्याला रिक्षा देखील सहज उपलब्ध होतात. 'भिवपुरी' हे गाव मुळातच निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. याच्या एका बाजूला उंचच उंच सह्याद्रीचे कडे आपले लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सगळ्या बाजूने धबधबे अक्षरशः कोसळत असतात. अश्या सुंदर ठिकाणी बांधला गेलेला 'पेशवेकालीन तलाव' यामध्ये अजून भर घालतो.


'सदाशिवरावभाऊ पेशवे' यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या तलावा…

'प्राँग्ज' दीपस्तंभ

Image
प्राचीन काळापासून समुद्रामधील 'दीपस्तंभांचे' महत्व आपल्याला दिसून येते. हे 'दीपस्तंभ' आजही आपली फार महत्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसतात. यासाठी 'दीपस्तंभ' म्हणजे काय हे पण आपल्याला थोडे समजून घेणे महत्वाचे ठरेल. 'दीपस्तंभ' म्हणजे समुद्रातल्या जहाजांना रात्रीच्या वेळेस रस्ता दाखवण्याचे काम हे 'दीपस्तंभ' शतकानुशतके करत आहेत. असाच एक महत्वाचा 'दीपस्तंभ' हा भारताची आर्थिक राजधानी असलेल्या 'मुंबई' शहराच्या नैऋत्येस असणाऱ्या 'कुलाबा' येथे आजही उभा आहे. कुलाबा येथील हा दीपस्तंभ 'प्राँग्ज' दीपस्तंभ' म्हणून ओळखला जातो.
मुंबई बेट जेव्हा पोर्तुगीजांकडे होते तेव्हा त्यांनी कुलाब्यापासून साधारणपणे ३.५ किलोमीटर अंतरावर जवळपास १४३ फूट उंचीचा एक दगडी मनोरा उभारला ह्या दगडी मनोऱ्यावर जहाजांना रात्रीचे मार्गदर्शन व्हावे यासाठी आग पेटवली जात असे. पुढे जेव्हा इंग्रजांची सत्ता मुंबईवर आली तेव्हा इंग्रजांनी याच ठिकाणी इ.स. १७६८ साली ५००० रुपये खर्च करून भारतामधील पहिला 'दीपस्तंभ' बांधला. हा दीपस्तंभ नव्याने बांधला तेव…

रामचंद्रदेव यादव याचा कोपराड येथील 'गद्धेगाळ'

Image
आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध राजसत्ता नांदल्या त्यापैकीच एक महत्वाची राजसत्ता म्हणजे देवगिरीचे यादव घराणे. या घराण्यातील 'रामचंद्रदेव यादव' हा सर्वश्रुत आहेच. याच 'रामचंद्रदेव यादव' राजाचा एक महत्वाचा शिलालेख असलेला एक गद्धेगाळ सापडला तो ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील कोपराड या गावी. हा शिलालेख महत्वाचा ठरतो याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे  या गद्धेगाळाच्या शिलालेखामध्ये आपल्याला मुसलमानी अधिकाऱ्याचे नाव दिसते त्यामुळे हा शिलालेख अत्यंत महत्वाचा ठरतो.
'रामचंद्रदेव यादव' याचा हा शिलालेख कसा सापडला ते देखील पाहणे आपल्याला फार महत्वाचे ठरेल. इ.स. १९५५ मध्ये तत्कालीन एशियाटिक सोसायटी, मुंबई येथील ग्रंथपाल 'श्री. अ. ना. गोरे' हे जेव्हा कोपराड येथे 'चक्रवर्ती सम्राट अशोक' याच्या ९ व्या शिलालेखाचा पूर्वार्ध शोधायला गेले होते तेव्हा कोपराड गावामध्ये त्यांना 'रामचंद्रदेव यादव' याचा हा शिलालेख मिळाला. हा शिलालेख मिळाल्यानंतर त्यांनी कोपराड या गावामधून ही गद्धेगाळाची शिळा त्यांनी एशियाटिक सोसायटी, मुंबई येथे आणली. एशियाटिक सोसायटी, मुंबई येथे …