Posts

Showing posts from July, 2019

निजामशाहीच्या अस्ताचा साक्षीदार असलेला 'जीवधन किल्ला'

Image
आपल्या महाराष्ट्र देशामध्ये जवळपास ४०० पेक्षा अधिक किल्ले आहेत यातील बऱ्याच किल्ल्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे तर काही किल्ले आजही आपला मूक इतिहास स्वत:जवळ बाळगून बसलेले आहेत. असेच काही प्रसिद्ध किल्ले 'जुन्नरच्या उर्फ जीर्णनगरच्या' आसमंतातत विविध कालखंडात बांधले गेले आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकीच एक महत्वाचा किल्ला म्हणजे नाणेघाटाचा अगदी सख्खा शेजारी असणारा आणि आपल्या बेलाग सूळक्याने सगळ्या भटक्यांना खुणावणारा 'जीवधन किल्ला' आजही आपले अस्तित्व आणि आपला इतिहास जपत नाणेघाटाच्या शेजारी उभा आहे. 
सातवाहनकालीन नाणेघाट आणि जीवधन किल्ला हे पाहायचे असल्यास आपल्याला प्राचीन नगरी जुन्नर येथे येऊन आसमंतातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या 'शिवनेरी किल्ल्याचे' खालूनच दर्शन घेऊन 'शिवाजी चौकातून' आपटाळे  मार्गे आपल्याला 'जीवधन' किल्ल्याच्या पायथ्याचे 'घाटघर' हे गाव गाठावे लागते. यासाठी आपली स्वत:ची गाडी असेल तर कधीही उत्तम ठरते आपला वेळ देखील वाचतो परंतु ज्यांना बस ने जायचे असेल त्यांनी जुन्नर बस स्थानकावरून 'घाटघर&#…

गद्धेगाळावरील शापवचने

Image
लेखामध्ये शापवचने घालण्याची पद्धत ही साधारणपणे ५ व्या शतकापसून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही शापवचने जो कोणी ताम्रपट किंवा शिलालेखामध्ये लिहून किंवा कोरून दिलेले दान मोडेल किंवा त्याला बाधा आणेल अश्या व्यक्तीला ते उद्देशून असते आणि त्याची रचना साधारणपणे सारखी असते. या शापवचनामध्ये फरक पडला तर वाचनाच्या संख्येत किंवा शब्दांमध्ये बदल होतो बऱ्याचदा सर्व लेखातून

स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां। षष्टी वर्षसहस्त्राणी विष्टायां जायते कृमी:।।

या श्लोकाची रचना शापवचनाच्या कामी केली जाते. बऱ्याचदा मराठी लेखामधून हेच शापवचन आपल्याला आढळून येते याची उदाहरणे म्हणजे आंबेजोगाई आणि वेळापूर येथील लेख. शिलाहारांच्या आणि यादवांच्या लेखातून शापवचने मराठी भाषेत घालण्याची प्रथा रूढ झालेली आपल्याला पहायला मिळते आणि यातून 'गद्धेगाळ' म्हणजेच (ass-curse) या नावाने प्रसिद्ध असणारे वचन पुढे रूढ झालेले आपल्याला दिसते.

अक्षी गावातील 'गद्धेगाळ'.
गद्धेगाळवर काही श्लोक आढळतात त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे:-
१) तेहाची माय गाढवे झविजे (हा परळ येथे असलेल्या गद्धेगाळ वर कोरलेला लेख आहे) २) तेयाचीऐ …