मुठा नदीच्या काठावर असलेला दुर्मिळ 'वाळूंज वृक्ष'


महाराष्ट्रात अश्या बऱ्याच भौगोलिक गोष्टी आहेत कि ज्या बऱ्याचवेळेस आपल्या नजरेमधून सुटतात बघायच्या राहतात. अश्या या भौगोलिक गोष्टी बऱ्याचवेळेस आपल्या अगदी जवळ असतात पण आपण त्या बघत नाही. पुण्यामध्ये असाच एक मुठा नदीकाठाच्या बाजूला असणारा 'वाळूंज' नावाचा  दुर्मिळ वृक्ष आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. पुणेकर रोजच या 'वाळूंज' वृक्षाच्या आजूबाजूने जातात परंतु फार कमी लोकांची नजर या वृक्षाकडे जाते किंवा वनस्पती अभ्यासकांशिवाय कोणाला तो जास्त माहिती देखील नाही.

दुर्मिळ असलेला 'वाळूंज' वृक्ष हा यशवंतराव चव्हाण पुल म्हणजेच (टू व्हीलर ब्रीज) हा कर्वे रस्त्याच्या उताराच्या इथे जोडलेला आहे तिथेच हा दुर्मिळ वाळूंज वृक्ष आपल्याला बघायला मिळतो. या दुर्मिळ असलेल्या 'वाळूंज' वृक्षाच्या आजूबाजूला आपल्याला शिरीष, बाभूळ हे देखील वृक्ष पहायला देखील मिळतात. पुणे शहरामध्ये असलेल्या या दुर्मिळ 'वाळूंज वृक्षाची' नोंद ब्रिटीश वनस्पती शास्त्रज्ञांनी देखील केलेली आहे. या पाणवठ्याच्या ठिकाणी आढळणाऱ्या 'वाळूंज' वृक्षाचे शास्त्रीय नाव हे 'सॅॅलिक्स टेट्रास्पर्मा' असे नाव आहे.

यशवंतराव चव्हाण पुल येथे 'वाळूंज' वृक्ष याबाबत लावलेली माहितीची पाटी.  

'वाळूंज' हा वृक्ष हा नद्यांच्या काठी आढळणारा पानगळी वृक्ष आहे. या 'वाळूंज' वृक्षाची नर वृक्ष आणि मादी वृक्ष अशी स्वतंत्र झाडे असतात. पुण्यामध्ये जो एकमेव 'वाळूंज' वृक्ष आपल्याला नदीकाठी मिळतो तो नर वृक्ष आहे. साधारणपणे हा 'वाळूंज' वृक्ष ३२ ते ४० फुट उंच वाढू शकतो. या 'वाळूंज' वृक्षाला खूप फांद्या असतात तसेच याच्या खोडावरील साल हे खडबडीत असून त्याच्यावर उभ्या भेगा आपल्याला बघायला मिळतात. या 'वाळूंज' वृक्षाची पाने हि मागच्या बाजूने चकचकीत पांढरी असतात म्हणून उन्हामध्ये हि पाने आपल्याला चकचकीत दिसतात.

या सॅॅलिकेसी कुळातील या झाडाच्या शास्त्रीय नावाची उत्पत्ती बघणे देखील फार महत्वाचे आहे. सॅॅल म्हणजे जवळ आणि लिक्स म्हणजे पाणी. पाण्याजवळ वाढणारा तो 'सॅॅलिक्स' आणि 'टेट्रा' म्हणजे 'चार' आणि 'स्पर्मा' म्हणजे 'बिया'. म्हणून 'सॅॅलिक्स टेट्रास्पर्मा' असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. या 'वाळूंज' वृक्षाची पाने हि एकांतरीत असून याच्या कडा या सूक्ष्म दंतुर दिसून येतात. याच्या पानांचा वरचा पृष्ठभाग हा निळसर हिरवा असतो तर खालचा भाग हा लवयुक्त असतो. याच कारणामुळे या 'वाळूंज' या वृक्षाची पाने उन्हामध्ये चमकतात.

यशवंतराव चव्हाण पुल म्हणजेच (टू व्हीलर ब्रीज) हा कर्वे रस्त्याच्या उताराच्या इथे जोडलेला आहे तिथेच हा दुर्मिळ वाळूंज वृक्ष आपल्याला बघायला मिळतो.

'वाळूंज' वृक्षाला पानाच्या बगलेतून पिवळ्या रंगाच्या मंजिऱ्या येतात तसेच हा वृक्ष एकलिंगी असल्यामुळे या 'वाळूंज'वृक्षाची फुले हि देखील अतिशय बारीक आणि एकलिंगी असतात. 'वाळूंज' वृक्षाची फळे हि देखील आकाराने लहान असतात. पुण्यातील हा वाळूंज वृक्ष हा नर असल्याने ह्या 'वाळूंज' वृक्षाला फक्त फुले येतात त्याला फळे येत नाहीत. या 'वाळूंज'वृक्षाच्या बिया या अगदी बारीक असतात तसेच या वृक्षाच्या एका फळात चार बिया असतात. या दुर्मिळ असलेल्या 'वाळूंज' वृक्षाला नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधी मध्ये फुले येतात.

'वाळूंज वृक्षाचा' उपयोग हा फळ्या बनविण्यासाठी करतात. तसेच याच्या लाकडाचे वासे खांब म्हणून देखील वापरतात. या वाळूंज वृक्षाच्या खोडापासून क्रिकेटच्या बॅॅट देखील बनवतात. 'वाळूंज' वृक्षाचे साल हे फार महत्वाचे असते. इ.स. १८९२ साली 'लेराँँ' या फ्रेंच शास्त्रज्ञाने या वृक्षाच्या सालापासून 'सॅॅलिसीन' नावाचे द्रव्य काढले. हे 'सॅॅलिसीन' नावाचे द्रव्य म्हणजेच आजचे 'अँँस्पिरिन' होय. सालीपासून बनवलेला हा काढा डोकेदुखी थांबवतो. अश्या प्रकारे हि एक औषधी वनस्पती देखील आहे. असा हा बहुउपयोगी असलेला एकमेव दुर्मिळ 'वाळूंज' वृक्ष हा मुठेच्या काठावर उभा आहे. असे हे दुर्मिळ असलेले वृक्ष वाचवणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

एकमेव दुर्मिळ 'वाळूंज' वृक्ष हा मुठेच्या काठावर उभा आहे.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-
१) पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष:- पृष्ठ क्रमांक १९ आणि २०, डॉ विनया घाटे आणि डॉ हेमा साने, पर्यावरण शिक्षण केंद्र आणि भारतीय सांस्कृतिक कला निधी, पुणे. २००५.
२) मुठेकाठचे पुणे:- पृष्ठ क्रमांक ४७ आणि ४८, प्र.के.घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे. २०१५.       

______________________________________________________________________________________________

महत्वाचे:-

१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे. 

२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा. 

३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

४) धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

_________________________________________________________________________________________
             
लिखाण आणि छायाचित्रे © २०२० महाराष्ट्राची शोधयात्रा
           

No comments:

Post a Comment

Thank You For Comment...!!! :)

INSTAGRAM FEED

@maharashtraheritage