Posts

महाराष्ट्रातील किल्यांवरचा 'पुष्प महोत्सव'

Image
नुकताच श्रावण संपलेला असतो हिरवाई सगळीकडे बहरलेली असते सुंदर छोटे छोटे झरे खळखळ करत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत वाहत असतात. सगळीकडे प्रसन्न वातावरण असते आणि या प्रसन्न वातावरणात छोटी छोटी सुंदर रानफुले आपले डोके वर काढून सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर उमलायला लागली असतात. अश्या या डोंगर माथ्यावर उगवलेल्या रानफुलांनी सह्याद्रीचे 'शिरोमणी' असणारे 'किल्ले आणि उत्तुंग शिखरे' यांच्या डोक्यावर पिवळ्या, लाल, निळ्या अश्या विविध फुलांचा 'मुकुट' या किल्यांनी आणि शिखरांनी आपल्या डोक्यावर चढवलेला असतो. हा पुष्पमहोत्सव म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
अश्या या फुलांचा महोत्सव पहायचा असेल तर कोणत्याही किल्यावर जावे आणि मनमुराद भटकावे ह्या फुलांच्या महोत्सवात प्रत्येक किल्ला हा आपले वेगळे रूप दर्शवत असतो. आपल्या सह्याद्रीवर निसर्गाने भरपूर माया केली आहे या मायेचे एक सुंदर रूप आपल्याला सह्याद्री मध्ये उमलणाऱ्या सुंदर सुंदर फुलांमधून आपल्याला पाहायला मिळते अनुभवायला मिळते. सह्याद्रीत उमलणाऱ्या फुलांचे एक अद्भूत जग आपल्याला अनुभवायचे असेल तर सह्याद्रीतील अनवट किल्ले, मोठी …

'वीरगळ, स्मारकशिळा आणि छत्री' यांचे ऐतिहासिक महत्व.

Image
स्मारक उभारण्याची परंपरा भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे असे आपल्याला पाहायला मिळते आजच्या काळात त्याचे स्वरूप जरी बदलले तरी त्याच्यामागची कल्पना एकच आहे हे आपल्याला समजते मग तो एखादा स्तंभ, देवळी, समाधी, वीरगळ, सतीशिळा किंवा मग छत्री असेल या सगळ्याचा इतिहास फार महत्वाचा आहे. पराक्रमी पुरुषांच्या विरकथा तसेच सत्पुरुष लोकांच्या समाध्या किंवा त्यांचे महत्वाचे संदेश तसेच सतीने केलेले अग्निदिव्य या सर्वगोष्टी आपल्याकडील जनमानसात वेगवेगळ्या स्वरूपात किंवा लोककथांमधून प्रचलित आहेत. आपल्याकडील वेगवेगळ्या लोककथांमधून या सर्व वीरांचे गुणगान केलेले आपल्याला पहायला मिळते. 
ज्या वीरांनी पराक्रम गाजवला तसेच आपल्या गावचे रक्षण केले त्या वीरांच्या समरणार्थ लोकांनी वीरगळ बनवले. साधू पुरुषांच्या समाध्या बनवल्या तसेच सती गेल्या स्त्री साठी सतीशिळा आणि तुळशी वृंदावन बनविले गेले हे सर्व उभारण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या आठवणी आणि या आठवणीतून चालू पिढीला त्यापासून स्फूर्ती मिळणे हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश.
ज्या वीरांनी पराक्रम गाजवला तसेच आपल्या गावचे रक्षण केले त्या वीरां…

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील शेक्सपिअर यांनी काढलेली '१९१५ मधील छायाचित्रे'

Image
बऱ्याचवेळेस आपण इंटरनेट आणि संग्रहालये पाहायला गेलो कि विविध काळातील जुनी छायाचित्रे देखील पाहतो अशीच काही छायाचित्रे हि १९१६ साली किंवा त्याच्या थोड्या आधी हि ब्रिटीश अधिकारी 'कर्नल  एल. डब्ल्यू. शेक्सपिअर' हे जेव्हा पुण्यामध्ये बदली होऊन आले होते तेव्हा त्यांनी काढली. 'कर्नल  एल. डब्ल्यू. शेक्सपिअर' हे स्वत: ब्रिटीश आर्मी मध्ये 'Assistant Quartermaster-General 6th Poona Division' या हुद्द्यावर होते. तसेच त्यांनी. 'History of The 2ND K.E.O. GOORKHAS' आणि 'History of  Upper Assam and North-East Frontier' हि पुस्तके त्या काळामध्ये लिहिली आहेत. 
त्यांच्या पुस्तकाच्या मनोगतामध्ये ते पुढीलप्रमाणे लिहितात:-
Knowing there must be many others far more knowledgeable than myself in these matters of local history, I venture on this subject with diffidence in the hope that, though an abler pen might have made more of it, and in spite of its faults; it may prove of interest to those whose lives are cast in this historic locality.
                            …

सिंधुदुर्ग मधील शिवाजी महाराजांच्या हाताच्या ठश्यांंवरील 'घुमटी संबंधित महत्वाचे पत्र'

Image
'सिंधुदुर्ग किल्ला' म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला एक महत्वाचा मुकुटमणी. जेव्हा शिवाजी महाराजांची नजर मालवण जवळच्या 'कुरटे बेटावर' पडली तेव्हाच त्यांच्या मनात 'कुरटे बेटाची' जागा मनात भरली आणि 'चौऱ्याऐंंशी बंदरी ऐसी जागा नाही' असा शिवाजी महाराजांनी आदेश दिला. दिनांक १० नोव्हेंबर १६६४ रोजी मालवणच्या किनाऱ्यावर श्री गणेशाचे पूजन केले गेले आणि सोन्याचा नारळ समुद्रास अर्पण करून 'सिंधुदुर्ग किल्ल्याची' पायाभरणी सुरु झाली. मालवण जवळच्या 'कुरटे बेटावर' तीन वर्षांनंतर जवळपास १ कोटी होन खर्च होऊन शिवाजी महाराजांनी बनवलेला 'सिंधुदुर्ग किल्ला' तयार झाला आणि मुरुड जंजीरा येथील सिद्धी, मुंबई मधील इंग्रज, आणि गोव्यातील पोर्तुगीज यांना खूप मोठी जरब बसली. 
मालवणपासून अगदी जवळ असलेला सिंधुदुर्ग किल्ला अजून एका महत्वाच्या कारणासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे या एकमेव किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचा 'उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा' पाहायला मिळतो. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचे मंदिर देखील पाहायला मिळत…

दुर्गभटक्यांची पंढरी 'हरिश्चंद्रगडाचे नामाभिधान' याचा मागोवा

Image
पुणे, ठाणे आणि नगर या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला 'हरिश्चंद्रगड' हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. या गडासंबंधित बऱ्याच पौराणिक आख्यायिका आहेत तसेच गडावर प्राचीन मंदिरे देखील आहेत. हा 'हरिश्चंद्रगड' मुळातच प्रसिद्ध आहे तो त्याच्या नैसर्गिक 'कोकणकड्यामुळे'. त्यामुळे या ऐतिहासिक 'हरिश्चंद्रगडावर' कायमच दुर्गभटक्यांची गर्दी असते. याच 'हरिश्चंद्रगडावर' आपल्याला १३ व्या शतकातील मंदिरे देखील पहावयास मिळतात. अश्या या 'हरिश्चंद्रगडाचे' नामाभिधान' कसे पडले हा प्रश्न नेहमी सर्व लोकांना पडतो त्यासाठी एक आख्यायिका कायम सांगितली जाते. ती सत्यवान 'हरीश्चंद्र' राजाची परंतु त्याला कोणताही पुरावा मिळत नाही.
'हरीश्चंद्र' हा मुख्यत्वे पौराणिक परंपरेनुसार सुर्यवंशातील 'त्रिशंकू' याचा मुलगा. त्याची राजधानी हि 'अयोध्या' होती. या 'हरिश्चंद्र' राजाने दक्षिण भारतामध्ये असलेल्या 'अहमदनगर जिल्ह्यात' किल्ला का बांधावा? हा देखील मोठा प्रश्न आहे. या संबंधात आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणे फार महत्वाचे ठरेल…